Download App

पाकिस्तानचे पंतप्रधान देणार राजीनामा; असेंब्ली विसर्जित करण्याची शिफारस

Pakistan Politics: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. नुकतीच माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाली होती. आता पंतप्रधान शाहबाज शरीफ बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे. त्यानंतर ते पाकिस्तान नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याची शिफारस करणार असल्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सांगितले आहे.

इस्लामाबादमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना शरीफ म्हणाले, “उद्या आमच्या सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मी नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्यासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहीन.

शाहबाज शरीफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर अंतरिम सरकार देशाची जबाबदारी घेईल. संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 12 ऑगस्ट रोजी संपत आहे. राष्ट्रपती अल्वी यांनी पंतप्रधानांचा सल्ला मान्य केल्यास 48 तासांत नॅशनल असेंब्ली विसर्जित केली जाऊ शकते.

अमेरिकन खासदार 15 ऑगस्टला पाहुणे: आजोबा होते स्वातंत्र्यसैनिक, गांधीजींसोबत तुरुंगातही गेले


पाकिस्तानमध्ये 90 दिवसांत निवडणुका घ्याव्या लागतील

सरकारने जाहीर केले आहे की नॅशनल असेंब्ली निर्धारित वेळेच्या तीन दिवस अगोदर विसर्जित केली जाईल, त्यानंतर 90 दिवसांच्या आत निवडणुका होतील. यामुळे शाहबाज शरीफ पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. यामुळे त्यांनी रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या जनरल मुख्यालयाला भेट दिली, तेथेही त्यांना निरोप देण्यात आला.

द एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान शरीफ यांनी मंगळवारी जनरल हेडक्वार्टरला निरोप दिला. यावेळी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पंतप्रधानांचे जोरदार स्वागत केले.

Manipur Violence : मणिपूर पोलिसांकडून निमलष्करी दल अन् आसाम रायफलविरोधात गुन्हा, कारण…

नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याचा सरकारचा डाव का आहे?
दरम्यान, आघाडी सरकार संसद बरखास्त करण्याची शिफारस करेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे, मात्र राष्ट्रपती अल्वी लगेच अधिसूचना जारी करण्यास नकार देतील, अशी शक्यता आहे. त्यामुळेच असेंब्ली संपण्याच्या तीन दिवस आधी ती विसर्जित करण्याचा सल्ला दिला जात आहे. जेणेकरून राष्ट्रपतींनी नकार दिला तरी असेंब्लीचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नॅशनल असेंब्ली बरखास्त करावी लागेल. यानंतर पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाला 90 दिवसांच्या आत निवडणुका घ्याव्या लागतील.

Tags

follow us