Manipur Violence : मणिपूर पोलिसांकडून निमलष्करी दल अन् आसाम रायफलविरोधात गुन्हा, कारण…

Manipur Violence : मणिपूर पोलिसांकडून निमलष्करी दल अन् आसाम रायफलविरोधात गुन्हा, कारण…

Manipur Violence : मणिपूरमध्ये अद्यापही दोन समुदयांमध्ये हिंसाचार सुरुच असून अशातच आता मणिपूर पोलिसांकडून केंद्रीय निमलष्करी दलासह आसाम रायफलविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 5 ऑगस्ट रोजी बिष्णुपूर जिल्ह्यांतील तीन जणांच्या हत्याकांडप्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आसाम रायफलच्या जवानांनी रोखल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

अनिल गोटेंचा प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा, शरद पवारांची साथ सोडणार?

मणिपूर पोलिस आरोपींना पकडण्यासाठी गेले असता पोलिस-आसाम रायफल जवानांमध्ये झालेल्या कथित संघर्षाबाबत समाजमाध्यमांवर समोर आलं होतं. त्यानंतर 5 तासांच्या आत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : वैद्यकीय महाविद्यालयाचा डिनच निघाला लाचखोर! 10 लाख घेताना पकडलं…

तीन जणांच्या हत्याकांड प्रकरणी मणिपूर पोलिसांकडून तपास सुरु होता. हत्यांकाडातील आरोपींचा पाठलाग करताना जवानांनी हस्तक्षेप करत पोलिसांशी कथित वाद घातला आहे. फोलगंज परिसरातील वार्ड क्रमांक 8 मध्ये पोलिस दाखल होते.

पोलिस या परिसरात पोहचले तेव्हा जवानांनी पोलिसांच्या पथकाला थांबवलं होतं. आसाम रायफलच्या जवानांनी रस्त्यात गाडी लावून पोलिसांचा मार्ग अडवला असल्याचं पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube