Pune News : वैद्यकीय महाविद्यालयाचा डिनच निघाला लाचखोर! 10 लाख घेताना पकडलं…

Pune News : वैद्यकीय महाविद्यालयाचा डिनच निघाला लाचखोर! 10 लाख घेताना पकडलं…

पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण ट्रस्टंतर्गत असलेल्या अटल बिहारी वाजपेयी महाविद्यालयाचे डिन आशिष श्रीनाथ बनगिनवार यांना 10 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं आहे. आशिष बनगिनवार यांना अटक करण्यात आली असून महाविद्यालयाचा डिनच लाचखोर निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

‘आहे का इथं कुणी माई का लाल…’ ; फडणवीसांना तोंडघशी पाडणारा मुनगंटीवारांचा व्हिडिओ व्हायरल

तक्राराच्या माहितीनूसार, तक्रारदार यांचा मुलगा एनईईटी परिक्षा 2023 मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एमबीबीएसच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये वैद्यकिय महाविद्यालयात पुणे येथे इन्स्टिटयुशनल कोटा मधून निवड झाली होती. या निवड यादीचे आधारे तक्रारदार हे आशिष बनगिनवार (डिन) यांना मुलाच्या एमबीबीएसच्या महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेसाठी भेटण्यासाठी गेले होते.

उबाठा आणि मनसे एकत्र येणार का? मनसेच्या अमेय खोपरकरांनी स्पष्टच सांगितलं…

बनगिनवार यांनी दरवर्षाची शासनमान्य विहीत फी 22 लाख 50 हजार रूपये व्यतिरिक्त प्रवेशासाठी 16 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर तक्रारदार लाचेचा पहिला हप्ता म्हणून 10 लाख रुपये घेऊन बनगिनवार यांच्या कार्यालयात गेले. बनगिनवार यांनी तक्रारदाराकडून 10 लाख रुपये घेतले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले आहे.

दरम्यान, या प्रकरणी डिन बनगिनवार यांच्याविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube