अमेरिकेत एपस्टिन फाईल्स सार्वजनिक; बिल क्लिंटन, पॉप गायक मायकल जॅक्सन ट्रम्प यांच्यासह अनेकांचे फोटो समोर
या फाईल्समधील फोटोत माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप गायक मायकल जॅक्सन, काही देशांचे राजदूत, खासदार, राजपूत्र, यांचा समावेश आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टिन फाईल्स सार्वजनिक केल्या आहेत. (America) लैंगिक शोषणाच्या आरोपात दोषी असलेला जेफ्री एपस्टीनचे काळे कारनामे या फाईल्समध्ये आहेत. अर्थात हमाम में सब…हे वाक्य एकजात सर्वांनाच लागू होते. या प्रकरणात अनेक राजकीय नेते, बडे उद्योगपती, प्रभावशाली व्यक्ती, अर्थक्षेत्रातील दादा माणसांची खरे चेहरे समोर आले आहेत.
या फाईल्समधील फोटोत माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप गायक मायकल जॅक्सन, काही देशांचे राजदूत, खासदार, राजपूत्र, यांचा समावेश आहे. एपस्टीन आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एकदम खास मित्र होते. पण या फाईल्समधून ट्रम्प यांचे नाव वगळण्यात आल्याचे समोर येत आहे. या गुंत्यातून पाय मोकळा करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न उघड झाला आहे. त्यामुळे आता सर्वच फाईल उघडा आणि त्यातील सत्यता बाहेर येऊ द्या अशी मागणी ट्रम्प समर्थकांनी केली आहे.
अमेरिका किंवा इस्त्राइलच्या हल्ल्यांना कडक प्रत्युत्तर देऊ; इराणची अमेरिकेला थेट धमकी
अमेरिकन न्याय विभागाने शुक्रवारी 95,000 फोटो, ई-मेल्स, काही दस्तावेज समोर आणली. तर त्यापूर्वी सुद्धा अश्लील मॅसेज आणि मुलींचे रेटकार्ड समोर आणले होते. या फाईल्समध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख नाही. मात्र डेमोक्रॅटिक पक्षाचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे फोटो आणि नाव समोर आले आहे. त्यावरून टीकेची झोड उठली आहे. प्रशासन ट्रम्प यांना वाचवण्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावर आता डिप्टी अटॉर्नी जनरल टॉड ब्लांश यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
अमेरिकन काँग्रेसने दिलेल्या मुदतीत शुक्रवारी लाखो दस्तानवेज सार्वजनिक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर येत्या आठवड्यात आणखी फाईल्स सार्वजनिक करण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला. सध्या सार्वजनिक करण्यात आलेल्या दस्तावेजात तपासांचे पुरावे, छायाचित्रे आणि कागदपत्रे सार्वजनिक करण्यात आले आहेत. अमेरिकेत या सर्व पुराव्यांमुळे मोठा भूकंप आला आहे. अनेकांचे बुरखे टराटरा फाटली आहेत.
फोटोत काय काय?
एका फोटोमध्ये बिल क्लिंटन घिसलेन मॅक्सवेलसोबत स्विमिंग पुलमध्ये दिसत आहेत. तर एका दुसऱ्या फोटोत क्लिंटन मायकल जॅक्सनसोबत आहे. प्रसिद्ध गायिका डायना रॉसही तिथे उपस्थित असल्याचे दिसून येते.क्लिंटन यांच्या प्रवक्त्याने या घडामोडींवर मत व्यक्त केलं आहे. चौकशी क्लिंटनविरोधात झालेली नाही. ही सर्व फोटो 20 वर्षांपूर्वीची आहेत. त्यात काही मोठे नाही. सार्वजनिक जीवनात अनेकांसोबत त्यांची छायाचित्र असल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी क्लिंटन यांच्या प्रवक्त्याने ट्रम्प प्रशासनावर टीका केली आहे.
