Download App

पाकिस्तानचे पंतप्रधानपद म्हणजे `कत्तल` : विजनवास, अटक, फाशी या पैकी काहीतरी होणारच!

Pakistan Former Prime Minister Imran Khan arrested : माजी पंतप्रधान आणि पीटीआय प्रमुख इम्रान खान यांना मंगळवारी निमलष्करी रेंजर्सनी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातून ताब्यात घेतले आहे. इम्रान खान एका प्रकरणांच्या सुनावणीसाठी आले होते. देशाच्या सर्वोच्च कार्यकारी पदावर असलेल्या व्यक्तींना तुरुंगात टाकण्याचा पाकिस्तानचा मोठा इतिहास आहे. आतापर्यंत पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कधी कधी अटक झाली ते पाहूया.

हुसेन शहीद सुहरावर्दी
हुसेन शहीद सुहरावर्दी हे पाकिस्तानचे पाचवे पंतप्रधान होते. जनरल अयुब खान यांच्या सरकारला मान्यता देण्यास नकार दिला. त्यांना जानेवारी 1962 मध्ये अटक करण्यात आली होती.

झुल्फिकार अली भुट्टो
5 जुलै 1977 रोजी लष्करप्रमुख जिला-उल-हक यांनी सत्तापालटानंतर त्यांना अटक केली. विरोधी पक्षनेते नवाब मोहम्मद अहमद खान यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. 4 एप्रिल 1979 रोजी त्यांना फाशी देण्यात आली.

बेनझीर भुट्टो
– पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांना 1999 मध्ये 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. 27 डिसेंबर 2007 रोजी रावळपिंडी येथे रॅलीनंतर आत्मघातकी बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू झाला.

नवाझ शरीफ
1999 मध्ये जनरल परवेज मुशर्रफ यांनी त्यांना पाकिस्तानातून हद्दपार केले होते. जुलै 2018 मध्ये त्यांची मुलगी मरियम नवाजसह नवाजला अटक करून 10 वर्षांची शिक्षा सुनावली. नवाज शरिफ अजूनही पाकिस्तानमध्ये परतले नाहीत.

आफ्रिकेतील चित्त्यांचे भारतात मरण; तिसऱ्या चित्त्यानेही सोडला प्राण

युसूफ रझा गिलानी
युसूफ रझा गिलानी 2008 मध्ये आघाडी सरकारचे पंतप्रधान झाले. पंतप्रधान होण्यापूर्वीच ते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने 2012 मध्ये पदावरून काढून टाकले.

शाहिद खाकान अब्बासी
शाहिद खाकान अब्बासी 2017 ते 2018 पर्यंत पंतप्रधान होते. अब्बासी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली होती.

Imran Khan : खेळाचं मैदान गाजवणाऱ्या इम्रान खानला राजकारणानं पाठवलं तुरुंगात

शेहबाज शरीफ
सप्टेंबर 2020 मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन फेटाळल्यानंतर पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना 28 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. सुमारे सात महिन्यांनंतर लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली.

इम्रान खान
मे 2023: इम्रान खानला 9 मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातून अल कादिर विद्यापीठ ट्रस्टशी संबंधित एका प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Tags

follow us