आफ्रिकेतील चित्त्यांचे भारतात मरण; तिसऱ्या चित्त्यानेही सोडला प्राण
Kuno National Park : दक्षिण आफ्रिकेतून आणून मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्क (Kuno National Park) येथे ठेवण्यात आलेल्या एका मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत तीन चित्ते मृत्यूमुखी पडले आहेत. चित्त्यांतील आपसातील संघर्षात या तिसऱ्या चित्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याआधी दगावलेल्या दोन चित्त्यांपैकी एकाचा मृत्यू किडनी इंफेक्शनने तर दुसऱ्याचा मृत्यू कार्डियक अॅरेस्टमुळे झाला होता.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही मादी चित्ता जखमी होती. पशुवैद्यकांनी औषधोपचार केले. तरी देखील या दुखापतीवर ती मात करू शकली नाही. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मादी चित्त्याचा मृत्यू झाला. दक्षा असे या मादी चित्त्याचे नाव होते.
भारतात आले आणखी १२ चित्ते; दक्षिण आफ्रिकेतून आलेले विमान ग्वालेरमध्ये उतरलं
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या मादी चित्त्याच्या शरीरावर जखमा होत्या. दुसऱ्या चित्त्याने केलेल्या हल्ल्यामुळे या जखमा झाल्याचे दिसत होते. या घटनेनंतर काही वेळात मादी चित्ता मृत्यूमुखी पडली. आता नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
भारतात चित्त्यांची संख्येत वाढ करण्यात यावी, या अनुषंगाने दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात एक करार झाला होता. याअगोदर ८ चित्ते भारतात आणले गेले आहेत. यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात 12 चित्ते आणण्यात आले.
मणिपूर हिंसाचार ! 60 लोकांचा मृत्यू तर 1700 घरं जळून खाक…
१९५२ मध्येच चित्ता नामशेष झाल्याचे घोषित
१९५२ मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. मध्य प्रदेशाच्या जंगलात सोडण्यात आले असलेले हे चित्ते नामिबियातील आहेत. त्यांना या नवीन वर्षांच्या सुरुवातीला स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराखाली आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुनो नॅशनल पार्कमध्ये ८ चित्ते सोडले होते. मोदी सरकारने १७ सप्टेंबर २०२२ या दिवशी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात ८ चित्ते आणण्यात आले होते. या चित्त्यांची चर्चा देशभर चांगलीच झाली.
नामिबियातून हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणण्यात आले. १९४७ नंतर पहिल्यांदा भारतात चित्ते बघितले गेले. त्याअगोदर सुरजगुजाच्या राजाने जे आता छत्तीसगढमध्ये आहे, ३ चित्ते शिकारीत मारले होते. मात्र आता जे चित्ते आणले गेले आहेत, आता त्यानंतर १२ चित्त्यांची भर त्यामध्ये टाकण्यात आली.