Download App

G7 Summit : आधी पत्र लिहले आता थेट भेट; रशिया- युक्रेन युद्धानंतर मोदी अन् झेलेन्स्की आमनेसामने

  • Written By: Last Updated:

PM Modi Meets Volodymyr Zelenskyy:  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) शुक्रवारी (19 मे) G-7 गटाच्या वार्षिक शिखर परिषदेला (summit council) आणि चतुर्पक्षीय सुरक्षा संवाद (QUAD) गटाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले.

वार्षिक G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी, पंतप्रधान मोदी यांनी कोरिया प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल आणि व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन चिन यांच्याशी द्विपक्षीय बैठका घेतल्या. जपानमधील हिरोशिमा या ऐतिहासिक शहरात ही बैठक झाली. या बैठकींमध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला.

जपानमधील हिरोशिमा येथे G7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. गेल्या वर्षी रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट आहे.

Video : पुन्हा दिसला दोस्ताना! भर बैठकीत मोदींनी उठून बायडन यांना दिली ‘जादू की झप्पी’

जपानमधील हिरोशिमा येथे G7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. गेल्या वर्षी रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट आहे.

दोन हजारची नोट बंद झाल्यामुळे तुमच्या बँक ठेवीच्या व्याजदरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या…

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यातील ही भेट दोन्ही देशांच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांमध्ये अनेक बैठका झाल्यानंतर झाली. युक्रेनचे प्रथम उप परराष्ट्र मंत्री एमीन झापरोवा गेल्या महिन्यातच भारत दौऱ्यावर आले होते.

दरम्यान, युक्रेनचे पहिले उप परराष्ट्र मंत्री एमीन झापरोवा यांनी गेल्या महिन्यात भारताला भेट दिली होती. युक्रेनवर रशियाचे आक्रमण सुरू झाल्यानंतर युक्रेनच्या प्रमुख नेत्याची ही पहिलीच भारत भेट होती. यादरम्यान झापरोवा यांनी परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांना एक पत्र सुपूर्द केले. हे पत्र झेलेन्स्की यांनी पीएम मोदींच्या नावाने लिहिले होते.

Tags

follow us