Video : पुन्हा दिसला दोस्ताना! भर बैठकीत मोदींनी उठून बायडन यांना दिली ‘जादू की झप्पी’

Video : पुन्हा दिसला दोस्ताना! भर बैठकीत मोदींनी उठून बायडन यांना दिली ‘जादू की झप्पी’

Biden came and hugged Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) शुक्रवारी (19 मे) G-7 गटाच्या वार्षिक शिखर परिषदेला (summit council) आणि चतुर्पक्षीय सुरक्षा संवाद (QUAD) गटाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले होते. दरम्यान, पंतप्रधान (Narendra Modi) यांची शनिवारी (20 मे) हिरोशिमा येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी भेट घेतली.

सध्या जपानमधील हिरोशिमा येथे G-7 देशांची शिखर परिषद सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या बैठकीत पोहोचून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गळाभेट घेतली. जपानमध्ये सुरू असलेल्या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचे जपानचे पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीने स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान मोदी सभागृहात येऊन बसले. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मोदींच्या एका बाजूला बसले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सभागृहात आल्यावर ते पीएम मोदींच्या दिशेने जाऊ लागले. बायडेन यांनी मोदींच्या पाठीमागून जाऊन मोदींना मिठी मारली. एकमेकांना घट्ट मिठी मारल्यानंतर दोघांनी एकमेकांचा हस्तांदोलन करून एकमेकांशी संवाद साधला. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमधील जागतिक समस्यांवर जागतिक नेत्यांशी विचारांची देवाणघेवाण करतील आणि त्या सोडवण्याच्या मार्गांवर एकत्रितपणे चर्चा करतील.

QUAD नेते महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील

व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपानमधील क्वाड नेते गंभीर आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, उच्च-गुणवत्तेच्या पायाभूत सुविधा, जागतिक आरोग्य, हवामान बदल, सागरी क्षेत्र जागरूकता आणि भारतातील लोकांमध्ये सुधारणा कशी करू शकतात यावर चर्चा करतील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube