‘ड्रॅगन आणि हत्तीने एकत्र यायला हवे…’, पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी काय म्हटले?

PM Modi Xi Jinping Meet at SCO Summit China : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. सात वर्षांनंतर पंतप्रधान मोदी चीन दौर्‍यावर गेलेले आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 50 मिनिटे चर्चा झाली. यावेळी मोदींशी बोलताना जिनपिंग म्हणाले की, “चीन आणि भारत या दोन प्राचीन संस्कृती आहेत. आपण दोघंही […]

Letsupmarathi (19)

Letsupmarathi (19)

PM Modi Xi Jinping Meet at SCO Summit China : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. सात वर्षांनंतर पंतप्रधान मोदी चीन दौर्‍यावर गेलेले आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 50 मिनिटे चर्चा झाली. यावेळी मोदींशी बोलताना जिनपिंग म्हणाले की, “चीन आणि भारत या दोन प्राचीन संस्कृती आहेत. आपण दोघंही जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे देश आहोत. आपण ‘ग्लोबल साउथ’चेही महत्त्वाचे सदस्य आहोत. आपल्याला आपल्या लोकांच्या भल्यासाठी आवश्यक सुधारणांमध्ये पुढाकार घ्यायचा आहे तसेच मानव समाजाच्या प्रगतीस चालना देण्याची ऐतिहासिक जबाबदारीही पार पाडायची आहे”.

Video : मोठी बातमी! मराठा आंदोलक सुप्रिया सुळेंविरोधात आक्रमक, जरांगेंच्या भेटीनंतर अडवला ताफा

ड्रॅगन आणि हत्तीने एकत्र यायला हवे

चीनमध्ये झालेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे चीनच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने दोन्ही नेत्यांमध्ये प्रतिनिधी स्तरावरील चर्चा पार पडली. प्रारंभी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रविवारी म्हटले की, “भारत आणि चीनने एकमेकांचे मित्र आणि चांगले शेजारी होणे अत्यंत आवश्यक आहे”. शी जिनपिंग म्‍हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आनंद झाला. गेल्या वर्षी कझानमध्ये आपल्यात फार उपयोगी चर्चा झाली होती. दोन्‍ही देशांनी सैनिकांची सीमारेषेवरून माघार घेतल्यानंतर शांतता आणि स्थैर्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सीमा विषयावर विशेष प्रतिनिधींनी एक करार केला आहे. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली आहे आणि दोन्ही देशांदरम्यान थेट विमानसेवाही पुन्हा सुरू झाल्या आहेत”.

‘का लिहितात लोक एखाद्याबद्दल इतकं वाईट?…’; प्रिया मराठेच्या निधनानंतर मुग्धा गोडबोले रानडे भावनिक

“दोन देशांच्या जनतेच्या कल्याणात सुधारणा करणे, विकसनशील देशांच्या ऐक्य आणि पुनरुज्जीवनाला चालना देणे, आणि मानवी समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे ही आपली ऐतिहासिक जबाबदारी आहे. आपले संबंध शेजारधर्माचे, स्नेहाचे असावेत, आपण एकमेकांच्या यशात भागीदार असावं आणि ‘ड्रॅगन’ व ‘हत्ती’ एकत्र यावेत”, असे आवाहनही त्‍यांनी केले.

तु्म्ही चारवेळा मुख्यमंत्री, जबाबदारी असताना का नाही निभावली?, विखे पाटलांचा पवारांवर थेट वार

भारत-चीन संबंधांमधील गुंता

भारत (PM Modi) आणि चीन यांच्यातील संबंध अत्यंत गुंतागुंतीचे आहेत. दोन्ही देशांमध्ये वादग्रस्त सीमा हा मोठा आणि कायमस्वरूपीचा मुद्दा आहे. 2020 मधील गलवान खोऱ्यातील संघर्षामुळे दोन्ही देशांच्या संबंधांना मोठा धक्का बसला. त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध तणावग्रस्त होत राहिले. वादग्रस्त सीमा या मुद्द्याव्यतिरिक्त चीन अरुणाचल प्रदेशावरही आपला हक्क सांगतो.

अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे (Tariff) भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत भारताला चीनसारख्या देशावर अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र चीनवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे भारतासाठी धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत चीनसोबतचे संबंध सुधारताना आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणे भारतासाठी आवश्यक आहे.

Exit mobile version