Download App

भारतात टेस्लाची एन्ट्री पक्की! PM मोदींनी मस्कला केला फोन; दोघांत काय चर्चा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) शुक्रवारी टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांना (Elon Musk) फोन केला.

PM Modi Spoke to Elon Musk : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) शुक्रवारी टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांना (Elon Musk) फोन केला. यावेळी भारत आणि अमेरिका यांच्यात (India US Relation) तांत्रिक आणि इनोवेशनच्या क्षेत्रात एकत्रित काम करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली. भारतात वेगाने वाढणारे टेक्नॉलॉजी सेक्टर आणि एलन मस्क यांच्या कंपन्यांत सहकार्याच्या मु्द्द्यावर चर्चा झाली.

एअरटेलची एलन मस्कच्या कंपनीसोबत हातमिळवणी! शेअर्सच्या किमतीत वाढ, गुंतवणूक करण्याची योग्य वेळ?

पीएम मोदींनी काय सांगितलं?

पीएम नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की मी एलन मस्क यांच्याशी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टनमध्ये ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली होती त्या विषयांचा यात समावेश होता. तांत्रिक आणि इनोवेशन क्षेत्रात एकत्रित काम करण्यातील शक्यतांवर चर्चा करण्यात आली. या क्षेत्रात भारत अमेरिकेबरोबरील आपली भागीदारीला आधिक बळकट करण्यासाठी तयार आहे असे पंतप्रधान मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

फेब्रुवारीत झाली होती भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एलन मस्क यांची भेट फेब्रुवारी महिन्यात झाली होती. त्यावेळी पीएम मोदी अमेरिका दौऱ्यावर होते. या भेटीत इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा, अंतराळ या क्षेत्रात एकत्रित काम करण्यांच्या शक्यतांवर चर्चा झाली होती. या भेटीनंतर पीएम मोदींनी एलन मस्क यांच्या मुलांना काही पुस्तके भेट दिली होती. यात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे द क्रसेंट मून, आर. के. नारायण यांचे द ग्रेट आर. के. नारायण कलेक्शन आणि पंडित विष्णू शर्मा यांचे पंचतंत्र या पुस्तकांचा समावेश होता.

follow us