Download App

Israel-Hamas War : ….तर इस्त्रायलाचाच सर्वनाश होईल; तुर्की राष्ट्राध्यक्षांचा इशारा

  • Written By: Last Updated:

Israel Hamas Conflict: शनिवारपासून इस्त्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्या संघर्ष सुरू आहे. आज पाच दिवस झाले तहीही हा संघर्ष अजून मिटला नाही. उलट दिवसेंदिवस हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. या संघर्षात अनेक देशांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे. गाझामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक देश इस्रायलच्या बाजूने असताना, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान (President Erdogan) यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्यावर जोरदार टीका करतांना गाझापट्टीतीलीन संहाराचा निषेध नोंदवला.

सिक्सर किंग रोहित शर्माने झळकावले शतक, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला 

हमासने इस्त्रायलवर पाच हजार रॉकेट डागले. इस्त्रायलनेही प्रत्युत्तर म्हणून गाझा पट्टीवर रॉकेट हल्ले केले. आतापर्यंत या हल्यात 3 हजार मृत्यू झालेत. जगातल्या अनेक देशांनी युध्दाबाबत आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या. अमेरिका, फ्रानस्, युके, इटली, भारत या देशांनी इस्त्रायलला पाठिंबा दिला. तर काही देशांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली. तुर्कीनेही पॅलेस्टाईनची बाजू घेतली.

एर्दोगान म्हणाले की, गाझा पट्टीतील एक देश म्हणून इस्रायल सामोरा जात नाही. इस्रायली लष्कराकडून गाझा पट्टीवर बॉम्बफेक करण्यात येत आहे. याचा निषेध असून इस्रायलने हे विसरता कामा नये की, एखाद्या देशाऐवजी एखाद्या संघटनेप्रमाणे काम केल्यास त्यांचाच सर्वनाश होईल, असा इशारा दिला. युद्धालाही काही मूल्ये असली पाहिजेत आणि दोन्ही बाजूंनी त्यांचे पालन केले पाहिजे. परंतु दुर्दैवाने, इस्रायल आणि गाझा पट्टीमध्ये या तत्त्वांचे गंभीर उल्लंघन केले जात आहे, असं म्हणत त्यांनी हजारो निष्पाण नागरिकांच्या मृत्यूंचा घटनेचा निषेध केला.

एर्दोगान यांनी सांगितले की, हे युद्ध संपवण्यासाठी तुर्कस्तान राजनैतिक प्रयत्नांसाठी कटिबद्ध आहे. दोन्ही देशांमधील सलोखा हाच प्रादेशिक शांतता प्रस्थापित करण्याचा एकमेव मार्ग आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष हे मध्यपूर्वेतील सर्व समस्यांचे मूळ आहे, असे सांगून एर्दोगन म्हणाले की, जोपर्यंत ही समस्या न्याय्यपद्धतीने सोडवली जात नाही तोपर्यंत हा प्रदेश शांततेपासून दूर राहील.

दरम्यान, दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीत इस्रायली युद्ध विमाने आणि विमानांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रगत तपास यंत्रणा बसवली होती. या तंत्रज्ञानाच्या मदतीने गाझा येथून येणाऱ्या-जाणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या विमानांवर नजर ठेवता येणार होती. मात्र, इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे हमासचे हे ट्रॅकिंग नेटवर्क मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज