सिक्सर किंग रोहित शर्माने झळकावले शतक, कपिल देव-सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

सिक्सर किंग रोहित शर्माने झळकावले शतक, कपिल देव-सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

Rohit Sharma Record: भारताचा कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध अवघ्या 63 चेंडूत शतक झळकावून इतिहास रचला आहे. अशाप्रकारे, रोहित शर्मा एकदिवसीय विश्वचषक सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वात कमी चेंडूंवर शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. याआधी, एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वात कमी चेंडूंवर शतक ठोकण्याचा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता. कपिल देवने 72 चेंडूत शतक झळकावले होते, मात्र आता रोहित शर्माने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
रोहित शर्माचे विश्वचषकातील हे सातवे शतक आहे. अशाप्रकारे रोहित शर्माने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. यापूर्वी भारताकडून विश्वचषकात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. विश्वचषकात सचिन तेंडुलकरच्या नावावर 6 शतके आहेत.

ICC Ranking: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दमदार खेळीचा कोहली-राहुलला फायदा, पाहा नवीन क्रमवारी

2015 च्या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा पहिल्यांदा खेळला होता. या विश्वचषकात रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. यानंतर रोहित शर्माने वर्ल्ड कप 2019 मध्ये 5 शतके झळकावली. मात्र, अशाप्रकारे एकदिवसीय विश्वचषकाचे सातवे शतक रोहित शर्माच्या बॅटने झळकावले आहे.

कपिल देवने 72 चेंडूत शतक ठोकले होते
याआधी कपिल देव यांनी 1983 च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध 72 चेंडूत शतकाचा टप्पा गाठला होता. हे भारताचे विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक ठरले होते, मात्र आता रोहित शर्माने कपिल देवला मागे टाकले आहे.

सर्वाधिक षटकारांचा विक्रम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माने केला आहे. अफगाणिस्तानविरोधात तिसरा षटकार मारताच रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाच झाला आहे. रोहित शर्माच्या नावावर सध्या 555 षटकारांची नोंद झाली आहे. रोहितने 473 डावात 555 षटकार मारले आहेत. यापूर्वी हा रेकॉर्ड ख्रिस गेल याने 553 षटकार ठोकले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube