Download App

शेअर मार्केटमध्ये 1929 सारखा हाहाकार उडणार; ‘रिच डॅड पुअर डॅड’ च्या लेखकाची थरकाप उडवणारी पोस्ट

Rich Dad Poor Dad Writer Robert Kiyosaki On Share Market :  देशभरातील गुंतवणूकदारांसाठी (Investers) एक महत्वाची बातमी समोर येतेय. शेअर मार्केटमध्ये 1929 सारखा हाहःकार उडणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. ‘रिच डॅड, पुअर डॅड’ या वित्त पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki) यांनी जागतिक बाजारपेठांच्या सध्याच्या स्थितीबद्दल एक गंभीर इशारा दिलाय. व्यापार युद्धे आणि अस्थिर अमेरिकन शेअर बाजारामुळे मंदीचा धोका वाढत आहे. त्यामुळे कियोसाकींनी इशारा दिलाय (Share Market) की, ही मंदी 1929 च्या महामंदीपेक्षाही भयंकर असू शकते.

एकीकडे जगात व्यापार युद्ध सुरू झालंय, तर दुसरीकडे अमेरिकेच्या शेअर बाजारांमध्ये आणि भारतासह सर्व आशियाई बाजारपेठांमध्ये मोठे चढउतार दिसून येत आहेत. अमेरिकन बाजारातील घसरणीमुळे (Stock Market News) मंदीच्या वाढत्या अंदाजामुळे चर्चाही तीव्र झाल्यात. दरम्यान, ‘रिच डॅड, पुअर डॅड’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी इतिहासातील सर्वात मोठ्या अपघाताचा इशारा दिलाय. या संदर्भात त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (आता एक्स) वर एक पोस्ट शेअर केलीय.

सतीश वाघ हत्या प्रकरण, हत्येपूर्वी जादूटोणा अन्…, दोषारोपपत्रात धक्कादायक माहिती

रॉबर्ट कियोसाकी यांनी मंगळवारी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, सध्या दिसून येणारी आर्थिक मंदी 1929 च्या मार्केट क्रॅशला मागे टाकू शकते. मला भीती आहे की ही घसरण इतिहासातील सर्वात मोठी असू शकते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगात व्यापार युद्ध सुरू झालंय, अशा वेळी रॉबर्ट कियोसाकी यांचा इशारा आला आहे. एवढंच नाही तर अमेरिकन बाजारपेठेत सतत घसरण दिसून येत आहे.

कियोसाकी यांनी जर्मनी, जपान आणि अमेरिकेच्या आर्थिक इंजिनकडे लक्ष वेधलंय. त्यांनी म्हटलंय की, काही अक्षम नेत्यांनी आपल्याला सापळ्यात अडकवलंय. अशा वेळी अस्वस्थ आणि भीती वाटणे सामान्य आहे, फक्त घाबरू नका, धीर धरा. कियोसाकी यांनी पुन्हा एकदा सोने आणि चांदी खरेदी करण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटलंय की, परिस्थिती कितीही अशांत असली तरी धीर धरा आणि शांत राहा. अलर्ट देण्यासोबतच, त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे गुंतवणूक रणनीती देखील शेअर केलीय. त्यांनी रिअल इस्टेट, सोने, चांदी आणि बिटकॉइन या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलाय.

प्रेक्षकांची धडधड वाढवणार! सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांच्यात ‘जाट’मध्ये युद्ध

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार , राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या “मेक अमेरिका ग्रेट अगेन” या अजेंडामुळे आणि चढ-उतार होणाऱ्या टॅरिफ धोरणांमुळे जागतिक आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली. 12 मार्चपासून अमेरिकेने स्टील आणि अॅल्युमिनियमच्या आयातीवर 25% टॅरिफ लादला. प्रत्युत्तर म्हणून, युरोपियन युनियन एप्रिलपासून 28.33 अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर प्रति-टॅरिफ लागू करेल. या व्यापार तणावामुळे भारतीय बाजारपेठांवर नकारात्मक परिणाम झाला, मंगळवारी बीएसई सेन्सेक्स 0.10% आणि निफ्टी 50 निर्देशांक 0.12% खाली आला.

follow us