Russia Civil War : प्रायव्हेट आर्मी वॅगनरचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin)हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin)यांच्या कठोरतेसमोर नमले आहेत. बंड केल्यानंतर अवघ्या 12 तासातच त्यांनी सरकारशी समझोता करार(Settlement Agreement) केला आहे. प्रिगोझिननं थेट देशाला नवा राष्ट्राध्यक्ष देण्याची घोषणाही केली होती. रशियन सैन्य आणि वॅगनर ग्रुपचे सैनिक यांच्यातील वादामुळे संपूर्ण रशियावर अंतर्गत विध्वंसाची टांगती तलवार उभी राहण्यामध्ये झाला होता. मात्र, अखेर दोन्ही बाजूंनी झालेल्या वाटाघाटींनंतर वॅगनर नरमले असून रशियातला संभाव्य विध्वंस टळला आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, वॅगनर ग्रुपचा प्रमुख येवगेनी प्रिगोझिन आणि रशियाच्या बाजूने वाटाघाटी करणारे बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांड ल्युकाशेंंको यांच्यातील चर्चा यशस्वी ठरली आहे. ही चर्चा पूर्ण झाल्यानंतर प्रिगोझिनने मॉस्कोच्या दिशेने जाणाऱ्या आपल्या सैन्याला थांबवण्याचे आदेश दिले आहेत. (russia-civil-war-yevgeny-prigozhin-bowed-down-to-putins-strictness)
Mumbai Rain; पाणी साचल्याने अंधेरी मेट्रो बंद, पहिल्याच दिवशी मुंबईकरांची तारांबळ
क्रेमलिनने स्पष्ट केले आहे की, बंडखोरी प्रकरणात येवगेनी प्रीगोझिनवरील आरोप मागे घेतले जातील. त्यांनी सांगितले की, त्यांच्याबरोबर सहभागी झालेल्या सैनिकांवर कारवाई केली जाणार नाही. यासह, बंडात भाग न घेतलेल्या वॅगनर गटाच्या सैनिकांना संरक्षण मंत्रालयाकडून नोकरीचे कंत्राट दिले जाईल. पुतीन दोन दशकांहून अधिक काळ सत्तेत आहेत. हे संकट टाळण्यासाठी सरकारने हा करार मान्य केला आहे.
सुनील छेत्री-महेश सिंगची दमदार कामगिरी, नेपाळचा 2-0 ने धुव्वा
बेलारुस राष्ट्राध्यक्षांच्या मीडियाच्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे. वॅगनर ग्रुपचे प्रमुख प्रिगोगिन आणि रशियन सरकार यांच्यात एक मोठा करार झाला आहे. तणाव कमी करण्यासाठी बेलारूसने वॅगनरला प्रस्ताव दिला होता. त्यांनी वॅगनर चीफशी बोलून सांगितले की वॅगनर ग्रुपने बंड संपवण्याचे मान्य केले आहे. वॅगनरचे सैनिक मॉस्कोहून परतत आहेत.
प्रीगोजन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, रक्तपात थांबविण्यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे. वॅगनर मैदानी छावणीकडे परत जाईल. ते आता मॉस्कोच्या दिशेने जाणार नाहीत. ते म्हणाले, आम्ही आमचा ताफा परत करत आहोत. आम्ही मॉस्कोला जाणारा काफिला थांबवला आहे. यापूर्वी रशियन सैन्याने मॉस्कोकडे जाणारे सर्व रस्ते अडवले होते.
त्यानंतर अध्यक्ष पुतिन यांनी वॅगनर नेत्यांना ठार मारण्याचे आदेश दिले. राष्ट्राला दिलेल्या संदेशात पुतिन यांनी या बंडाला विश्वासघात आणि देशद्रोह म्हटले आहे. त्यांनी बंडखोरांना संपवण्याचे आश्वासन दिले होते.