सुनील छेत्री-महेश सिंगची दमदार कामगिरी, नेपाळचा 2-0 ने धुव्वा
Saff Championship 2023: सैफ चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सामन्यात भारताने नेपाळचा 2-0 ने पराभव केला आहे. या विजयासह भारताने उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील पहिला हाफ बरोबरीत संपला पण दुसऱ्या हाफमध्ये सुनील छेत्रीने 61 व्या मिनिटाला भारतासाठी गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर महेश सिंगने 69 व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी 2-0 अशी वाढवली. यादरम्यान नेपाळच्या संघाने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही आणि त्यामुळे भारताने हा सामना 2-0 असा जिंकला. भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना आता कुवेतशी आहे.
सुनील छेत्री आणि महेश सिंग यांनी केलेल्या गोलच्या जोरावर भारतीय फुटबॉल संघाने सैफ चॅम्पियनशिप अ गटातील सामन्यात नेपाळचा 2-0 असा पराभव केला. श्री कांतीरवा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताकडून कर्णधार सुनील छेत्री (61वे मिनिट) आणि महेश सिंग (70वे मिनिट) यांनी दोन गोल केले. कुवेतने नेपाळ आणि पाकिस्तानला पराभूत करून अ गटात अव्वल स्थान पटकावले, तर भारत आणि कुवेतविरुद्धचे दोन्ही सामने गमावल्यानंतर पाकिस्तानची गुणतालिकेत तळाशी घसरण झाली आहे.
Forest Guard Recruitment 2023: वन विभागात हजारो पदांसाठी जागा, अंतिम तारीख संपण्यापूर्वी अर्ज करा