Download App

रशिया युद्ध थांबवणार! अमेरिका अन् रशियाचा पुढाकार; ‘रियाद’मध्ये नेमकं काय घडलं?

तीन वर्षांपासून सुरू असलेले रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी आता वेगाने हालचाली होत आहेत.

Russia Ukraine War : तीन वर्षांपासून सुरू असलेले रशिया आणि युक्रेन यांच्यातील (Russia Ukraine War) युद्ध संपवण्यासाठी आता वेगाने हालचाली होत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी सांगितले की अमेरिका आणि रशिया चर्चेत सहभागी पक्षांनी युक्रेनमध्ये शांतता (Ukraine War) प्रस्थापित करण्यासाठी तसेच आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी एक उच्चस्तरीय पथक तयार करण्यावर सहमती दर्शवली आहे.

अमेरिका आणि रशियाच्या प्रतिनिधी (Russia) मंडळाने मंगळवारी रियाद येथे यु्क्रेन संकटावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने भेट घेऊन चर्चा केली. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यावेळी उपस्थित होते. मिडिया रिपोर्ट्सनुसार रुबियो यांनी सांगितले, दुतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या पूर्ववत करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. मागील काही वर्षांत घडलेल्या घडामोडींमुळे दोन्ही देशांतील राजनयिक मिशन संचालनाची क्षमता कमी झाली आहे.

मोठी बातमी! रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? ट्रम्प, झेलेन्स्की अन् पुतिन यांच्यात फोनवर चर्चा; काय घडलं..

रुबियो पुढे म्हणाले, सध्या फक्त डोनाल्ड ट्रम्प हेच युद्ध मिटवण्यासाठी सक्षम आहेत. काही महिन्यांतच राष्ट्रपची ट्रम्प यांनी जागतिक चर्चांना वेगळे वळण दिले. दरम्यान, अमेरिका आणि रशियाच्या अधिकाऱ्यांनी जवळपास चार तासांपेक्षा जास्त वेळ चर्चा केली. या चर्चेत युक्रेन आणि युरोपियन देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले नाहीत.

ट्रम्प रशियाबरोबर घाई गडबडीत एखादा करार करु शकतात अशी भीती युक्रेन आणि युरोपिय नेत्यांना वाटत आहे. त्यांच्या हितांकडे दुर्लक्ष करुन भविष्यात पुतिन यांना अन्य देशांना धमकावण्यासाठी मोकळे सोडले जाईल अशी शंका या देशांना वाटत आहे.

अमेरिका आणि रशियाच्या प्रतिनिधींची ही बैठक युरोपिय नेत्यांसाठी मोठा झटका आहे. युक्रेन संकटावर मार्ग (Ukraine Crisis) काढण्यात मोठी भूमिका बजावू शकतात असेही त्यांना वाटत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी सांगितले की ज्या चर्चेत आम्ही सहभागी नाही. त्या कोणत्याही चर्चेच्या आधारे कोणत्याही कराराला मान्यता दिली जाणार नाही.

रशिया-युक्रेन युद्धात भारतीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर; मायदेशी पाठवण्याची केली होती विनवणी

तीन वर्षांपासून युद्ध सुरुच

रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात हजारो लोकांचा बळी गेला आहे. शहरे उद्धवस्त झाली आहे. शाळा, रस्ते, दवाखाने जमीनदोस्त झाली आहेत. युद्धाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांनंतर कोणतीही शांती वार्ता झालेली नाही. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह पश्चिमी नेत्यांनी पुतिन यांच्याशी कोणतीच चर्चा केली नव्हती. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

follow us