Russia Ukraine War Vladimir Putin Warning : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आणखी चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. युद्धाच्या आगीत तेल ओतणारी एक घडामोड नुकतीच घडली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या एका वक्तव्यावरून युद्ध अधिक भडकण्याचे संकेत मिळाले आहेत. कोणत्याही शांतता कराराच्या आधी युक्रेनमध्ये जर विदेशी सैन्य तैनात केले गेले तर आमचं सैन्य त्यांना सोडणार नाही असा इशारा पुतिन यांनी दिला आहे. रशियातील व्लादिवोस्तोक शहरात आयोजित ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये पुतिन यांनी हा इशारा दिला. पुतिन यांच्या या वक्तव्यामागे कारणही आहे. युरोपीय नेत्यांनी युक्रेनमध्ये शांती सैन्य पाठवण्याचे वक्तव्य अलीकडेच केले होते.
युरोपीय नेत्यांच्या या वक्तव्यानंतर पुतिन यांनी (Russia Ukraine War) उघड शब्दांत धमकीच दिली आहे. युक्रेनच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सैन्य पाठवण्याची (Vladimir Putin) भाषा या नेत्यांकडून केली गेली. मात्र असा विचार म्हणजे थेट युद्धाची तयारीच आहे असे पुतिन यांना वाटत असल्याचे त्यांच्या या वक्तव्यावरुन दिसत आहे. युद्धानंतर कोणत्याही प्रकारच्या शांतता दलाची गरज पुतिन यांनी नाकारली. या युद्धात जर अंतिम शांतता करार झाला तरच रशिया त्यावर अंमल करील. परंतु यासाठी दोन्ही पक्षांना सुरक्षेची हमी हवी आहे. पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी सांगितले की कोणत्याही करारासाठी कायदेशीर कागदपत्रांची गरज आहे. कुणाच्याही वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही.
अमेरिकेचा मोठा निर्णय; रशियावर निर्बंध कायम, तरीही ट्रम्पकडून हिरे करार मंजूर! जाणून घ्या कारण
युरोपीय देशांचा वेगळाच प्लॅन
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रों यांच्या उपस्थितीत गुरुवारी पॅरिसमध्ये एक बैठक झाली. 35 देशांच्या कोएलिशन ऑफ द विलिंगमधील 26 देश युद्धविरामानंतर यु्क्रेनच्या सुरक्षिततेसाठी सैन्य किंवा अन्य दल पाठवण्यास तयार आहेत, असे मॅक्रों यांनी सांगितले. या सैनिकांच्या मदतीने जमीन आणि हवाई क्षेत्रात निगराणी केली जाईल. तर दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी एका फोरममध्ये सुरक्षेची हमी यु्द्ध संपल्यानंतर नाही तर आतापासूनच पाहिजे असे सांगितले.
रशियाचा युक्रेनवर पुन्हा हल्ला
दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध तीन वर्षांपासून सुरू आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर तुफान हल्ले करत युद्धाला तोंड फोडलं. आतापर्यंत या युद्धात हजारो लोकांचा बळी गेला आहे. दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरे उद्धवस्त झाली आहेत. आता तरी युद्ध थांबावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. युद्धविरामावर चर्चा सुरू आहेत. मात्र तोडगा निघालेला नाही.
दुसरीकडे दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. एपी वृत्तसंस्थेनुसार गुरुवारी रात्री रशियाने युक्रेनवर 157 ड्रोन आणि 7 मिसाइल्स डागली. यातील 121 ड्रोन पाडले किंवा जाम केल्याची माहिती युक्रेनच्या वायूसेनेने दिली. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की आमच्या सैन्याने 92 युक्रेनी ड्रोन पाडले.
मोदींचा मास्टरस्ट्रोक! चीन-रशियासोबत आघाडी, आता डोनाल्ड ट्रम्पची दादागिरी चालणार नाही