ग्लास उचलला, टेबल स्वच्छ केला.. किम जोंगच्या कर्मचाऱ्यांनी पुरावे मिटवले? चीनमधला Video व्हायरल

Kim Jong Un Viral Video : जगात सनकी हुकूमशहा म्हणून उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन (Kim Jong Un) ओळखले जातात. किम कधी काय करील याचा काहीच अंदाज नाही. त्यामुळे देशातील जनता नेहमीच दडपणात वावरत असते. फक्त देशातच नाही तर परदेशातही किम जोंग उनचे कारनामे दिसत असतात. आताही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत उनचे कर्मचारी पुरावे नष्ट करताना दिसत आहेत. ज्या खुर्चीवर किम जोंग उन बसले होते ती खुर्ची, आर्मरेस्ट, गादी आणि टेबल देखील स्वच्छ पुसण्यात आले. स्पेशल ट्रे मागवून किम जोंग उन यांनी वापरलेला ग्लास नेण्यात आला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नेमकं काय आहे? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ या..
रशियन पत्रकार एलेक्झेंडर युनाशेव यांनी त्यांच्या Yunashev Live या चॅनेलवर लिहिले की रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि किम जोंग उन यांच्यातील चर्चा संपल्यानंतर किमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची उपस्थिती दर्शवणारे सर्व पुरावे काळजीपूर्वक नष्ट केले. येथील ग्लास हटवण्यात आले तसेच किम यांनी खुर्ची आणि टेबलवर ज्या ठिकाणी स्पर्श केला होता ती जागा देखील स्वच्छ करण्यात आली.
प्रत्येक वर्षी 25 सुंदर मुली, प्लेजर स्क्वाड अन् सनकीपणा; किम जोंगच्या कारनाम्यांचा पर्दाफाश
कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीने साफसफाई का केली याचा तपशील अजून समोर आलेला नाही. रशियाच्या गुप्तचर यंत्रणा आणि चीनच्या पाळतीला चकवा देण्यासाठी असे केले असावे असा अंदाज व्यक्त होत आहे. फक्त किम जोंगच नाही तर जगात आणखीही काही नेते असे आहेत जे आपले जैविक पुरावे नष्ट करण्याला नेहमीच प्राधान्य देतात. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचाही यात समावेश आहे.
रिपोर्ट्सनुसार पुतिन (Russian President Vladimir Putin)परदेश दौऱ्यांच्यावेळी आपली डीएनए सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करतात. 2017 पासून त्यांच्या सुरक्षा यंत्रणांकडून याबाबतीत अतिशय काळजीपूर्वक काम केले जाते. त्यांच्या या उपाययोजनांबाबत चर्चाही होत असते. परंतु, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या गोष्टी त्यांच्या यंत्रणांकडून प्राधान्याने केल्या जात असतात.
मोदींचा मास्टरस्ट्रोक! चीन-रशियासोबत आघाडी, आता डोनाल्ड ट्रम्पची दादागिरी चालणार नाही
व्हिडिओत नेमकं काय?
व्हिडिओत दिसत आहे की दोन्ही नेत्यांची बैठक संपताच उत्तर कोरियाचे दोन कर्मचारी किम जोंग यांनी स्पर्श केलेल्या प्रत्येक वस्तुची सफाई करत आहेत. किम जोंग ज्या खुर्चीवर बसले होते ती खुर्ची स्वच्छ करताना एक कर्मचारी दिसत आहे. तर दुसरा कर्मचारी पाण्याचा ग्लास एका ट्रेवर ठेऊन घेऊन जाताना दिसत आहे. टेबल, खुर्चीसह अन्य फर्निचरची अतिशय काळजीपूर्वक सफाई करताना कर्मचारी या व्हिडिओत दिसत आहेत.