Serbia School Shooting: युरोपियन देश सर्बिया (Serbia) मध्ये जीवघेणा गोळीबार झाला. बेलग्रेड (Belgrade) येथील एका शाळेमध्ये सातवीतल्या मुलाने गोळीबार (Firing) केल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ८ विद्यार्थी आणि एका सुरक्षा रक्षकाचा (Security Guard) समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. शिवाय अनेक जण जखमी झाले आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सर्बियाच्या गृह मंत्रालयाने या घटनेची माहिती दिली आहे. मंत्रालयाने एका निवेदनामध्ये सांगितले आहे की, गोळीबार झाल्याचे माहिती होताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे, आणि त्यांनी परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यातमध्ये ६ विद्यार्थी आणि १ शिक्षक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे, त्यांना उपचारासाठी हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले आहे.
AI आता तुमचे मनही वाचेल, मनातले विचारही लिहील, Texas मधील संशोधकांनी बनवले तंत्र
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलग्रेड (Belgrade) मधील व्लादिस्लाव रिबनीकर शाळेत आज सकाळी गोळीबार झाला आहे. शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. याप्रकरणी एका १४ वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की संशयितावर त्याच्या वडिलांची बंदूक वापरल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.