‘शाहबाज शरीफ Thank You’, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर भारताकडे रवाना

S Jaishankar Visit Pakistan : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) मध्ये भाग घेण्यासाठी

S Jaishankar Visit Pakistan : 'शाहबाज शरीफ Thank You', परराष्ट्र मंत्री जयशंकर भारताकडे रवाना

S Jaishankar Visit Pakistan : 'शाहबाज शरीफ Thank You', परराष्ट्र मंत्री जयशंकर भारताकडे रवाना

S Jaishankar Visit Pakistan : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) मध्ये भाग घेण्यासाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला (Islamabad) मंगळवारी पोहोचले होते. तर आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बुधवारी भारताकडे रवाना झाले आहे. त्यांनी ट्विट करत पाकिस्तानचे पंतप्रधान आणि इतर अधिकाऱ्यांचे आभार मानले.

इस्लामाबाद येथे आयोजित SCO देशांच्या सरकार प्रमुखांच्या (CHG) 23व्या शिखर परिषदेसाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताचे नेतृत्व केले. या परिषदेचे अध्यक्षस्थानी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) होते परराष्ट्र मंत्री एस जयशंकर नऊ वर्षानंतर पाकिस्तानला भेट देणार पहिले भारतीय परराष्ट्रमंत्री आहेत.

या परिषदेमध्ये एस जयशंकर म्हणाले होते की, जर सीमापार कारवाया दहशतवाद, अतिरेकी आणि फुटीरतावाद या तीन गोष्टींवर आधारित असतील तर व्यापार आणि कनेक्टिव्हिटी प्रभावित होईल आणि यामुळे सहकार्य वाढण्याची शक्यता नाही असं भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले होते. तसेच जयशंकर यांनी पूर्व लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये सुरू असलेली लष्करी अडथळे आणि हिंदी महासागर आणि इतर सामरिक पाण्यात चीनच्या वाढत्या लष्करी ताकदबद्दल देखील भाष्य केले आहे.

या बैठकीमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह बेलारूसचे पंतप्रधान रोमन गोलोव्हचेन्को, चीनचे पंतप्रधान ली केकियांग, रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्टिन, इराणचे प्रथम उपराष्ट्रपती मोहम्मद रेझा आरेफ, कझाकिस्तानचे पंतप्रधान ओलजास बेकतेनोव, किर्गिझ मंत्रिमंडळाचे प्रमुख अकिलबेक जापरोव, मंगोलियाचे पंतप्रधान लोयसनम ओयसून, इराणचे पंतप्रधान ओल्जास बेकतेनोव, ताजिकिस्तानचे पंतप्रधान कोहिर रसुलझोदा, तुर्कमेनिस्तानचे उपसभापती रशीद मेरेदोव आणि उझबेकिस्तानचे पंतप्रधान अब्दुल्ला अरिपोव्ह या परिषदेत उपस्थित होते.

Exit mobile version