Download App

आश्चर्यच! डासांना पकडण्यासाठी बॉर्डरवर ट्रॅकिंग डिव्हाईस; ‘या’ आजाराने दक्षिण कोरिया हैराण

दक्षिण कोरियाने कडेकोट बंदोबस्त असलेल्या देशाच्या बॉर्डरवर डासांना पकडण्यासाठी ट्रॅकिंग डिव्हाईस लावले आहेत.

South Korea News : दक्षिण कोरियाने कडेकोट (South Korea) बंदोबस्त असलेल्या देशाच्या बॉर्डरवर ट्रॅकिंग डिव्हाईस लावले आहेत. आता या डिव्हाईसचं काम ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. या डीव्हाईसच्या माध्यमातून सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार नाही तर सीमेपलीकडून येणाऱ्या मलेरियाच्या डासांना पकडण्याचे काम केले जाणार आहे. ही गोष्ट थोडी चमत्कारिक वाटेल पण असे नक्कीच घडत आहे.

यामागे कारणही गंभीर आहे. दक्षिण कोरिया अजूनही मलेरिया मुक्त (Malaria) झालेला नाही. हा आजार देशातील नागरिकांसाठी चांगलाच तापदायक ठरत आहे. AFP एजन्सीच्या रिपोर्टनुसार या समस्येमागे दक्षिण कोरियाचा शेजारी आणि कट्टर शत्रू देश उत्तर कोरिया आहे. या देशातही (North Korea) मलेरिया एक सामान्य आजार आहे आणि अजूनही या आजाराचे समूळ उच्चाटन झालेलं नाही. चला तर मग जाणून घेऊ या की दक्षिण कोरियासाठी मलेरिया इतकी मोठी समस्या का बनला आहे.

युक्रेनला धक्का! रशिया-उत्तर कोरियात ‘हा’ करार लागू; युद्धात रशियाला मिळणार मदत?

क्लायमेट चेंज वाढवतोय धोका

दक्षिण कोरिया सरकारने या वर्षात देशभरात मलेरिया संबंधी अलर्ट जारी केला होता. क्लायमेट चेंज, मुसळधार पाऊस (Heavy Rain) यामुळे डासांपासून होणारे आजार वाढण्याचा धोका कायम (Climate Change) असतो. DW हिंदीच्या रिपोर्टनुसार वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्रित प्रयत्न केले नाही तर आगामी काळात ही समस्या आणखी गंभीर होण्याचा धोका आहे.

दक्षिण कोरियाने याआधी एकदा देश मलेरिया मुक्त झाल्याची घोषणा केली होती. परंतु 1993 मध्ये एका सैनिकाला मलेरिया झाल्याचे आढळून आले होते. तेव्हापासून या आजाराने हातपाय पसरण्यास सुरूवात केली. मागील वर्षात देशभरात मलेरियाच्या रुग्णांत 80 टक्के वाढ नोंदविण्यात आली होती.

डास 12 किलोमीटर अंतर पार करतात

दोन्ही देशांत डीमिलिटराइज झोन हा कळीचा मुद्दा आहे. हा चार किलोमीटरचा प्रदेश निर्जन आहे. हा भाग जंगलाने व्याप्त आहे. या ठिकाणी माणसे शक्यतो जात नाहीत. डासांची पैदास होण्यासाठी या ठिकाणी अत्यंत पोषक वातावरण आहे असे तज्ञांचे मत आहे. यामध्ये मलेरियाचा फेलाव करणारे डासांचाही समावेश आहे. हे डास किमान 12 किलोमीटर अंतर सहज पार करू शकतात. अधिकृत आकडेवारीनुसार मागील दहा वर्षांच्या काळात दक्षिण कोरियातील 90 टक्के रुग्ण डिएमझेड जवळील भागात संक्रमित झाले होते.

तीव्र विरोध अन् संताप..फक्त सहाच तासांत दक्षिण कोरियाने मागे घेतला मार्शल लॉ

follow us