दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक कोसळला! भारतीय बाजाराला धोक्याची घंटा की संधीचा काळ?

South Korea's KOSPI index Indian market कोरीयाच्या शेअर बाजाराचा भारतावर देखील परिणाम होणार आहे.

South Korea's KOSPI Index Indian Market

South Korea's KOSPI Index Indian Market

South Korea’s KOSPI index has crashed is warning signal for Indian market or time of opportunity : आज कोरीयाच्या शेअर बाजारातून मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एआय (AI) आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील स्टॉक्स विक्रीचा जोर वाढल्याने दक्षिण कोरियाचा ‘कोस्पी’ (Kospi) निर्देशांक 7.4 टक्क्यांनी घसरून 5914.35 अंकांवर आला. याचा परिणाम आशियातील इतर बाजारपेठांवरही दिसून आला आणि जपानचा ‘निक्केई’ (Nikkei) व हाँगकाँगचा ‘हँग सेंग’ (Hang Seng) हे निर्देशांकही घसरणीसह तोट्यात आले. आता तुम्ही म्हणाल कोरीयाच्या शेअर बाजाराचा भारताशी काय संबंध तर संबंध आहे असा की, या हालचालींचा भारतावर देखील परिणाम होणार आहे. मात्र हा परिणाम सकारात्मक असेल की, नकारात्मक जाणून घ्या सविस्तर…

या घसरणीमागे प्रामुख्याने पाच कारणे असल्याचे मानले जात आहे.

1. अमेरिकेतील चिप कंपन्यांच्या शेअर्समधील घसरणीचा परिणाम
2. चीनच्या मेमरी चिप क्षेत्रातील विस्तारामुळे गुंतवणूकदार चिंतेत
3. AI क्षेत्रातील तेजी किती काळ टिकणार, याबाबत शंका
4. अमेरिकेतील रोखे उत्पन्नात वाढ
5. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील संघर्ष

परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे घसरणीची तीव्रता वाढली

दक्षिण कोरियातील घसरणीमध्ये परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा मोठा वाटा होता. सोल इकॉनॉमिक डेलीच्या वृत्तानुसार, सोलच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:40 वाजेपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी मुख्य बाजारात 1.81 ट्रिलियन वॉन मूल्याचे शेअर्स निव्वळ विकले. याउलट, किरकोळ गुंतवणूकदारांनी 1.05 ट्रिलियन वॉन आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 598.7 अब्ज वॉन मूल्याचे शेअर्स खरेदी केले. तंत्रज्ञान कंपन्यांचे मोठे प्रमाण असलेला कोस्डॅक (Kosdaq) निर्देशांकही 4 टक्क्यांहून अधिक घसरला.

भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होणार?

दक्षिण कोरियातील घसरणीचा परिणाम इतर आशियाई बाजारांवरही दिसून आला. जपानचा निक्केई निर्देशांक सुमारे 2.5 टक्क्यांनी, तर हाँगकाँगचा हँग सेंग 0.82 टक्क्यांनी घसरला. जपान वगळता आशिया-पॅसिफिक बाजारांचा एमएससीआय निर्देशांकही सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे 2 टक्क्यांनी खाली आला. मात्र, भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. भारतीय वेळेनुसार सकाळी 9:35 वाजता निफ्टी 50 निर्देशांक 0.57 टक्क्यांनी म्हणजेच 126.70 अंकांनी वाढून 22,490.05 वर व्यवहार करत होता. तर सेन्सेक्स 0.61 टक्क्यांनी म्हणजेच 440.92 अंकांनी वाढून 72,365.6 अंकांवर पोहोचला होता.

कोरियातील घसरण भारतासाठी फायद्याची ठरू शकते का?

विश्लेषकांच्या मते, याचा भारताला फायदा होऊ शकतो; मात्र तो आपोआप किंवा थेट होईलच असे नाही. AI क्षेत्रावर अधिक अवलंबून असलेल्या बाजारांतून परदेशी गुंतवणूकदारांनी पैसा काढून घेतला, तर त्यातील काही भांडवल भारतीय बाजारात येण्याची शक्यता आहे. InvestValue चे फंड मॅनेजर सिद्धार्थ पुरोहित यांनी जुलैमध्ये Goodreturns शी बोलताना, AI क्षेत्रातील गुंतवणुकीतून पैसा दुसरीकडे वळल्यास भारतात अतिरिक्त परदेशी गुंतवणूक येऊ शकते, असे म्हटले होते. त्यावेळी त्यांनी निफ्टीचे एका वर्षाच्या अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेतील मूल्यांकन सुमारे 20 पट असल्याचे सांगितले होते आणि ते तुलनेने आकर्षक असल्याचे नमूद केले होते.

दिवाळीच्या तोंडावरच महागाईचा भडका; 42 पैकी 41 दैनंदिन वस्तुंच्या किमतीत झाली वाढ

यापूर्वीही अशी परिस्थिती दिसून आली आहे. 29 जुलै रोजी अवघ्या दोन सत्रांत कोस्पी निर्देशांक 16.2 टक्क्यांनी घसरल्यानंतर परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) भारतीय शेअर बाजारात 2,982 कोटी रुपयांची खरेदी केली होती. 19 जूननंतरची ही त्यांची एका दिवसातील सर्वाधिक खरेदी होती. त्याच दिवशी निफ्टीने सहा आठवड्यांहून अधिक काळातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. मात्र, प्रत्येक वेळी असेच घडते असे नाही. 23 जून रोजी कोस्पी निर्देशांक एका टप्प्यावर 10 टक्क्यांपर्यंत घसरला होता, त्यावेळी निफ्टी 1.16 टक्क्यांनी खाली आला आणि निफ्टी IT निर्देशांकात 2 टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती.

‘ब्रेकिंग बॅड’मधील वॉल्टर व्हाईट ज्युनियर काळाच्या पडद्याआड; वयाच्या 34 व्या वर्षी निधन!

WealthMills Securities चे इक्विटी स्ट्रॅटेजी संचालक क्रांती बथिनी यांनी सोमवारी NDTV Profit शी बोलताना सांगितले की, परदेशी गुंतवणूकदारांसाठी कोरियन बाजारातील घडामोडी हा एक महत्त्वाचा संदर्भबिंदू आहे. तसेच, अनेक उदयोन्मुख बाजारपेठांमधून परदेशी भांडवल सातत्याने बाहेर जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. NSDL च्या आकडेवारीनुसार, 2026 मध्ये आतापर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) भारतीय शेअर बाजारातून निव्वळ 3.04 लाख कोटी रुपयांची विक्री केली आहे. आता कोरियातील घसरणीनंतर परदेशी गुंतवणुकीचा काही पैसा पुन्हा भारताकडे वळतो की गुंतवणूकदार उदयोन्मुख बाजारपेठांमधूनच मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात, याकडे आगामी सत्रांत बाजाराचे लक्ष असेल.

Exit mobile version