Download App

येमेनच्या राजधानीत मोठी दुर्घटना; चेंगराचेंगरीत 80 हून अधिक ठार

Stampede in Yemen: येमेनची राजधानी साना येथून एक दुखत बातमी समोर आली आहे. साना येथे जकात वाटण्याच्या कार्यक्रमादरम्यान मोठी गर्दी उसळली व चेंगराचेंगरी होऊन 80 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत आतापर्यंत 322 नागरिक जखमी झाले आहेत. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समवेश आहे. दरम्यान घटनास्थळी बचावकार्य युद्धातळीवर सुरु आहे. तसेच या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या 13 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमकी घटना काय आहे? जाणून घ्या
येमेनची राजधानी असलेल्या सानामध्ये नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यापाऱ्यांकडून नागरिकांना पैशांचं वाटप केलं जात होतं. मात्र, यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी मोठ्या संख्येनें लोकांनी गर्दी केल्याने घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. यात 80 हुन अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेकजण यामध्ये जखमी झाले आहे.

मोठी बातमी ! ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतले

दरम्यान या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी या परिसरात गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान या दुर्घटनेमुळे आयोजित कार्यक्रमाला गालबोट लागले असल्याचे दिसून येत आहे.

उष्णतेची लाट…हवामान विभागाचा ‘या’ राज्यांना ‘हाय अलर्ट’

राजधानी सानाच्या जुन्या शहरात ही घटना घडली. व्यापाऱ्यांनी गरीब लोकांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. जकात वाटप कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच अधिकाऱ्यांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

Tags

follow us