Download App

धक्कादायक! तैवानच्या सैन्यात चीनची घुसखोरी; पोलखोल झाल्यानंतर उडाली खळबळ

China Taiwan Conflict : जगाच्या पाठीवर चीन हा असा एक देश आहे जो त्याच्या कुरापतींसाठीच ओळखला जातो. दुसऱ्या देशांचं तंत्रज्ञान (China Taiwan Conflict) चोरण्यात चीन जसा पटाईत आहे तसाच कधी कोणत्या देशात आणि कुठे घुसखोरी करील याचा काहीच अंदाज नाही. आताही असाच धक्कादायक प्रकार चीनच्या (China News) बाबतीत घडला आहे. चीनने चक्क तैवानच्या (Taiwan) सैन्यातच घुसखोरी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. तैवानच्याच संरक्षण मंत्रालयाने या घुसखोरीची कबुली दिली आहे. देशाच्या सैन्यातील 62 सैनिकांकडे चीन रेजिडेंसीचा परवाना आहे म्हणजेच या सैनिकांकडे चीनमध्ये स्थायिक होण्याचा कायदेशीर अधिकार आहे.

सुरक्षा तज्ज्ञांच्या मते हा परवाना फक्त एक कागद नाही तर तैवानच्या सैन्यात संभावित स्लीपर सेल कार्यरत असण्याची शक्यता आहे. जर कदाचित चीनने तैवानवर हल्ला केलाच तर अशा परिस्थितीत हे सैनिक तैवानसाठी धोकादायक ठरू शकतात अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

तैवानी सैन्यात घुसखोरी की वेगळाच प्लॅन

1949 मधील गृहयुद्धानंतरपासून चीन तैवानला आपला हिस्सा मानत आहे. तैवानवर दबाव आणण्यासाठी सैन्य, सायबर आणि कूटनीतीचा वापर करत आहे. तैवान संरक्षण मंत्रालयाच्या या खुलाशाकडे तज्ज्ञ मंडळी चीनच्या ग्रे झोन रणनीतीचा एक भाग म्हणून पाहत आहेत. याअंतर्गत सरळ युद्ध करण्याऐवजी मनोवैज्ञानिक, आर्थिक आणि गुप्त पद्धतीने दबाव टाकला जातो.

चीनच्या भारतीयांना पायघड्या! चीनमध्ये होणार स्वागत; ड्रॅगननं भारतीयांसाठी घेतला ‘हा’ निर्णय

रेजिडेंसी परमिट लीगल पण..

तैवीनमध्ये चीनचे रेजिडेंसी परमिट बेकायदेशीर नाही. परंतु, यामुळे सैनिकांच्या संवेदनशील माहिती मिळण्याच्या मार्गांवर परिणाम होऊ शकतो. संरक्षण मंत्री वेलिंग्टन कू यांनी सांगितले की ज्या सैनिकांकडे असे परवाने आहेत अशा सैनिकांनी गोपनीय माहितीपासून दूर ठेवले जाईल. परंतु, कोणत्याही सैनिकाकडे चीनी पासपोर्ट किंवा कोणतेही ओळखपत्र मिळालेले नाही. जर मिळाले तर त्यांना तैवानची नागरिकता सोडावी लागेल.

तैवानची लोकसंख्या 2.3 कोटी आहे. यात 20 लाख लोक स्वतः किंवा त्यांचे पूर्वज आहेत जे चीनमधील माओच्या कम्युनिस्ट शासनापासून वाचण्यासाठी तैवानमध्ये आले होते. आजही येथील अनेक लोकांचे चीनबरोबर भावनिक आणि आर्थिक संबंध आहेत. त्यामुळे तैवानमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होण्यात अडचणी येतात.

या सगळ्यांत तैवान आपली सैन्य शक्ती वाढवण्यावर भर देत आहे. युवकांसाठी बंधनकारक असणाऱ्या सैन्य प्रशिक्षणाचा कालावधी वाढवण्यात आला आहे. नव्या तंत्रज्ञानाने युक्त असणारी विमाने आणि जमिनीवर चालणारी हत्यारे खरेदी केली जात आहेत. तैवानला अमेरिकेकडूनही भरपूर पाठिंबा मिळत आहे.

काय सांगता! ‘या’ देशात पाण्याला सोन्याचा भाव; एक लिटर पाण्याची किंमत ऐकून थक्क व्हाल

follow us