काय सांगता! ‘या’ देशात पाण्याला सोन्याचा भाव; एक लिटर पाण्याची किंमत ऐकून थक्क व्हाल

काय सांगता! ‘या’ देशात पाण्याला सोन्याचा भाव; एक लिटर पाण्याची किंमत ऐकून थक्क व्हाल

Switzerland Water Bottle Price : आपल्या देशात पाणी अगदी सहज उपलब्ध आहे. एक लिटर पाण्याची बॉटल (Water Bottle) फक्त 15 ते 20 रुपयांत मिळते. ठिकठिकाणी पाणी मोफतही उपलब्ध असते. पण तुम्हाला माहिती आहे का की जगाच्या पाठीवर असाही एक देश आहे जिथे साध्या पाण्यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागते. आज आपल्याकडे पाणी सहज उपलब्ध होते. पण जगात असे अनेक देश आहेत जिथे पाण्याचा कायम दुष्काळ आहे.

जरा विचार करा तुम्हाला एक लिटर पाण्यासाठी शेकडो रुपये खर्च करावे लागले तर..आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच एका देशाची माहिती देणार आहोत जिथे पाण्याची एक बॉटल विकत घेण्यासाठी भरमसाठ पैसे खर्च करावे लागतात.

बापरे! फक्त शरीरावरच नाही तर मेंदूवरही परिणाम करतो ‘हा’ आजार; धक्कादायक अहवाल

या देशात सर्वात महाग पाणी

भारतात बाटलीबंद पाण्याचा अपवाद सोडला तर पाणी फुकटच मिळते. पण स्वित्झर्लंड (Switzerland) असा देश आहे जिथे लोकांना फक्त एक लिटर पाण्यासाठी त्यांच्या पगारातील मोठा हिस्सा खर्च करावा लागतो. येथे पाण्याची एक छोटी बॉटलची (330 मिलिलीटर) किंमत 347 रुपयांच्या आसपास आहे. जर एक लिटर पाणी खरेदी करायचे असेल तर एक हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील. अशात दिवसभरातील पाण्याची गरज भागवण्यासाठी लोकांना त्यांच्या पगारातील मोठा हिस्सा खर्च करावा लागतो.

पाणी इतकं महाग का..

भारतात पेयजल सहज उपलब्ध आहे. भारतात पाण्याचे नैसर्गिक स्रोत भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे देशात पाण्याची कोणतीच टंचाई नाही. पण स्वित्झर्लंडमध्ये असे काहीही नाही. येथे पाण्याचे नैसर्गिक स्रोत फारसे नाहीत. तसेच येथे पाणी शुद्ध करण्यासाठीचे तंत्रज्ञान सुद्धा खूप खर्चिक आहे. येथे मजुरी खूप जास्त आहे. या सगळ्यांचा हिशोब केला तर लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारला खूप पैसे खर्च करावे लागतात. या कारणांमुळे येथे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात.

आश्चर्यच! चक्क कचऱ्यावर धावतात ‘या’ शहरातील बस; गॅस विक्रीतून मिळतंय लाखोंंचं उत्पन्न

follow us
  • fb
  • instagram
  • youtube