Taliban bans chess in Afghanistan over religious concerns : तालिबान राजवट आणि विचित्र आदेश हे समीकरण २०२१ मध्ये सत्ता काबीज केल्यापासून दिसून आले असून, या आदेशांची संपूर्ण जगात चर्चा झाली. आता पुन्हा तालिबानी सरकारने (Taliban Government) काढलेल्या एका अजब फतव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता हा फतवा नेमका काय तर, तालिबान सरकारने शरिया कायद्याचे उदाहरण देत अफगाणिस्तानमध्ये पुढील सूचना मिळेपर्यंत बुद्धिबळ (Chess) खेळण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. तालिबानच्या नेतृत्वाखालील क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ११ मे रोजी बुद्धिबळ खेळावरील बंदीची पुष्टी केली असून, धार्मिक चिंतांबाबत योग्य प्रतिसाद मिळेपर्यंत देशात या खेळावर बंदी राहील असे सांगितले आहे.
शिक्षणानंतर आता तालिबान सरकारची महिलांना खाण्यावर बंदी
बुद्धिबळावर का घालण्यात आली बंदी?
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारने बुद्धिबळ या खेळावर बंदी घालताना शरिया कायद्याचे उदाहरण दिले आहे. तालिबानला भीती आहे की हा खेळ जुगाराचे साधन बनला आहे. त्यामुळे प्रथम इस्लामिक कायद्यानुसार हा खेळ खेळणे योग्य आहे की नाही याची तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच बुद्धिबळावरील बंदी उठवायची की कायमची बंदी घालायची याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
Taliban bans chess in Afghanistan over religious concerns
Read @ANI Story | https://t.co/19hNv2UByU#Taliban #chess #Afghanistan pic.twitter.com/2jAn7w1CEZ
— ANI Digital (@ani_digital) May 12, 2025
तालिबानच्या या निर्णयाचा मोठा फटका येथील बुद्धिबळ खेळाडूंना बसणार आहे. अफगाणिस्तानातील तालिबानने बंदी घातलेला हा पहिलाच खेळ नसून यापूर्वीदेखील तालिबान सरकराने अनेक टोकाचे निर्णय घेत अनेक गोष्टींवर बंदी घातली असून, यापूर्वी तालिबान सरकारने तेथील महिलांना कोणत्याही प्रकारच्या खेळांमध्ये सहभागी होण्यावर बंदी घातली आहे. त्यानंतर आता पुढील आदेशापर्यंत अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
आता गोळी नाही तर भारताकडून गोळा चालणार; POK टार्गेट अन् मोदींनी ललकारलं…
सहावीनंतर मुलींना शिक्षणास बंदी
२०२१ मध्ये सत्ता काबीज केल्यापासून तालिबान सरकारने प्रतिबिंबित करणारे कायदे आणि नियम सातत्याने लादले आहेत. शरिया म्हणजेच इस्लामिक कायद्यामध्ये बुद्धिबळ हा जुगाराचा एक प्रकार मानला जातो, असे क्रीडा संचालनालयाचे प्रवक्ते अटल माशवानी यांनी म्हणत गेल्या वर्षी लागू केलेल्या कायद्यानुसार बुद्धिबळावर बंदी घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
ऑपरेशन सिंदूर : भारताला काय मिळालं, पाकिस्तानचं किती नुकसान? 12 पॉइंट्समध्ये घ्या जाणून..
अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने जवळजवळ दोन वर्षांपासून कोणतेही अधिकृत कार्यक्रम आयोजित केलेले नसून, गेल्या वर्षी, तालिबानने व्यावसायिक स्पर्धेत मिश्र मार्शल आर्ट्स (MMA) सारख्या फ्रीस्टाइलवर हा खेळ खूप हिंसक असल्याचे सांगत बंदी घातली होती. अफगाणिस्तानात सत्ता काबीज केल्यापासून, तालिबानने मुलींना सहावीच्या वरच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्यास बंदी घातली आहे आणि विद्यापीठे आणि वैद्यकीय शिक्षण केंद्रांचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद केले आहेत.