India Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामानंतरही (India Pakistan Tension) तणाव कायम आहे. बांग्लादेशात सत्तापालट झाल्यानंतर या देशाचेही भारताबरोबर खटके उडत आहेत. या तणावाच्या परिस्थितीतच बांग्लादेशातील इंटरनेटमध्ये मोठा बदल झाला आहे. बांग्लादेशच्या अंतरिम सरकारने एलन मस्कची कंपनी स्टारलिंक सोबत एक मोठी डील केली आहे. या माध्यमातून बांग्लादेश (Bangladesh) सॅटेलाइट इंटरनेट वापरणारा दक्षिण आशियातील पहिला देश बनला आहे.
भारत आणि पाकिस्तानात अजूनही Starlink च्या सेवा सुरू झालेल्या नाहीत. पाकिस्तानात कंपनीला फक्त तात्पुरता परवाना मिळाला आहे. सरकारकडून आवश्यक कार्यवाही केली जात आहे. भारतात कंपनीला मंजुरी मिळाली आहे परंतु, सर्व्हिस अजून सुरू झालेली नाही. याच दरम्यान बांग्लादेशने मात्र या दोन्ही देशांना मागे टाकले आहे.
एका रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार बांग्लादेशात Starlink इंटरनेटचा मासिक खर्च 4 हजार 200 टका (2900 रुपये) असेल. Starlink ची डिव्हाईस खरेदी करण्यासाठी 47 हजार टका (33 हजार रुपये) एकाच वेळी द्यावे लागतील. हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असू शकतो. ज्या लोकांना फास्ट इंटरनेट हवे आहे त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते. इंटरनेटचा हा प्लॅन सर्वसामान्यांसाठी आहे की उद्योजकांसाठी आहे याबाबत अजून स्पष्टता नाही.
पाकिस्तानी खेळाडूंना दणका! भारतात त्यांचे फोटोही नको; राजस्थान क्रिकेटचा मोठा निर्णय
दरम्यान, आजमितीस एलन मस्कच्या Starlink या कंपनीची (Elon Musk) इंटरनेट सेवा जगभरात विस्तारत आहे. आज जगातील 70 देश या कंपनीच्या इंटरनेटचा वापर करत आहेत. भारत आणि पाकिस्तानच्याही आधी बांग्लादेशने ही सर्व्हिस सुरू केली आहे. भारतातही या कंपनीची सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. बांग्लादेशच्या तुलनेत भारतात या कंपनीचे इंटरनेट निश्चितच चांगल्या दर्जाचे राहील.
Starlink’s high-speed, low-latency internet is now available in Bangladesh! 🛰️🇧🇩❤️ → https://t.co/Q0StscVtIP pic.twitter.com/J88dJC7rzR
— Starlink (@Starlink) May 20, 2025
ज्या ठिकाणी मोबाइल नेटवर्क पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी सॅटेलाइट इंटरनेट भन्नाट काम करील.
पूर, वादळाच्या परिस्थितीत नेटवर्क ठप्प झालेले असते परंतु, अशा वेळीही सॅटेलाइट इंटरनेट काम करत राहील.
Starlink चे लहान टर्मिनल आकाशात फिरणाऱ्या सॅटेलाइट्सकडून थेट सिग्नल घेतात. या कारणामुळे ही सर्व्हिस जास्त वेगवान आणि विश्वासार्ह आहे.
चीनच्या सापळ्यात अफगाणिस्तान! भारताला धक्का देत खेळली मोठी चाल; बैठकीचा गुप्त अजेंडा समोर