पाकिस्तानी खेळाडूंना दणका! भारतात त्यांचे फोटोही नको; राजस्थान क्रिकेटचा मोठा निर्णय

पाकिस्तानी खेळाडूंना दणका! भारतात त्यांचे फोटोही नको; राजस्थान क्रिकेटचा मोठा निर्णय

India Pakistan Conflict in Cricket : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाचा (India Pakistan Tension) प्रभाव क्रिकेटवर नेहमीच पडला आहे. दोन्ही देशांत ज्या ज्या वेळी तणाव निर्माण झाला त्या त्या वेळी क्रिकेट सामने रद्द करण्याची मागणी होत राहिली. आता तर पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांत (Pahalgam Terror Attack) तणाव प्रचंड वाढला आहे. क्रिकेटवरही याचा परिणाम झाला आहे. यातच आता राजस्थान क्रिकेट असोसिएशनने मोठा निर्णय घेतला आहे.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवले. या लष्करी मोहिमेत भारताने थेट पाकिस्तान आणि पाकव्यात काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. पाकिस्तानात हल्ले झाल्याने पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंनी भारताविरुद्ध गरळ ओकली होती. त्यामुळे आता राजस्थान क्रिकेट असोसिएशनने एक मोठा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानसोबत क्रिकेट नाही, बीसीसीआय घेणार ‘हा’ मोठा निर्णय

जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियम मधील वॉल ऑफ ग्लोरीमधून सर्व पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो हटवण्यात आले आहेत. ज्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी या मैदानावर क्रिकेट खेळले आहे त्यांचे फोटो याठिकाणी लावले जातात. पाकिस्तानच्या संघाने या मैदानावर एक कसोटी आणि चार एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामुळे येथे एकूण 25 पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो लावण्यात आले होते. परंतु, आता राजस्थान क्रिकेट असोसिएशनने सर्व पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतरही स्टेडियमवरुन पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो हटवण्यात आले होते. आता ज्या 25 खेळाडूंचे फोटो काढून टाकण्यात आले आहेत त्यात दानिश कनेरियाचाही फोटो आहे. दानिश हा पाकिस्तान क्रिकेट संघातील माजी हिंदू क्रिकेटपटू आहे. पहलगाम हल्ल्यानंतर कनेरियाने पाकिस्तान सरकारवर घणाघाती टीका केली होती. पाकिस्तानच दहशतवादाला पोसतोय हा आरोपही त्याने केला होता.

पाकिस्तान करतोय भारताची कॉपी

पाकिस्तानने याआधीही भारताची कॉपी केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची कॉपी पाकिस्तानने केली. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पाकिस्तानला कठोर संदेश देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आदमपूर एअरबेसवर पोहोचले होते. याचीच कॉपी पाकिस्तानचा पंतप्रधान शाहबाज शरीफने केली होती. शाहबाज शरीफने सैन्य ठिकाणांना भेटी देण्याचं काम सुरू केलं. या दौऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते. परंतु, त्याचा हा डाव त्याच्यावरच उलटला. सोशल मीडियावर लोकांनी या प्रकाराला कॉपी पेस्ट म्हणत शाहबाज शरीफला चांगलंच ट्रोल केलं.

पाकिस्तानकडून भारताच्या ‘या’ निर्णयाची कॉपी; वाचा, कोण अन् कशासाठी जाणार परदेशात ?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube