Download App

शिक्षिकेनं मोबाईल हिसकावून घेतल्यानं मुलीनं चक्क शाळाचं पेटवली; 20 जणांचा मृत्यू…

Shocking Story : मोबाईल वापराचं (Use mobile)वाढतं व्यसन किंवा अॅडिक्शन ही आजच्या काळातील मोठी अडचण बनली आहे. कोरोनाच्या (Corona)काळात लॉकडाऊनमध्ये (Lockdown) शिक्षण ऑनलाईन (online Education)असल्याने लहान मुलांच्या हातात मोबाईल आला आणि त्यांना जणूकाही त्याची सवयच जडली आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार मोबाईलचं व्यसन मुलांना मानसिकदृष्ट्या त्रस्त करत आहे. मोबाईल वापरानं मुलांमध्ये चिडचिड करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं अनेक मोठमोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता मोबाईल वापरणाऱ्या मुलीबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेली माहिती अशी की, दक्षिण अमेरिकन (South American)देश गयानाशी मधील एका शाळेत शिक्षिकिने मुलीकडून तीचा मोबाईल जप्त केला. त्याचा मुलीला अत्यंत राग आला. तीने रागाच्या भरात शाळेला आग लावल्याचा (Set fire to the school)आरोप आहे. त्या आगीमध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडण्यापूर्वी मुलीने जाळपोळ करण्याचीही धमकी दिली होती. त्यामुळे तीच्यावरच हा जाळपोळ केल्याचा संशय आहे.

संभाजीराजे छत्रपती कोल्हापूर सोडणार? लोकसभेसाठी राज्यातील 4 मतदारसंघांचा विचार सुरु

डेली स्टारच्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री महदिया माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहाला आग लागली. काही वेळातच त्या आगीने रुद्र रुप धारण केले. त्यात अनेक विद्यार्थिनी आणि कर्मचारी अडकल्याचे पाहायला मिळाले. तात्काळ अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र आग विझवण्यापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला होता.

राजधानी जॉर्ज टाऊनपासून सुमारे 200 मैलांवर सेंट्रल गयाना मायनिंग टाऊनमध्ये ही घटना घडली आहे. आता या प्रकरणात आग लावणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून शाळेतील विद्यार्थिनी असल्याचे पोलिसांनी तपासाअंती सांगितले आहे. विद्यार्थिनीचा मोबाईल तिच्या शिक्षिकेने जप्त केला आहे. याबद्दल ती नाराज होती. रागाच्या भरात तीने हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी विद्यार्थिनीने शाळेच्या प्रशासनाने तिचा मोबाईल हिसकावून जप्त केल्यामुळेच तिने आग लावली. वास्तविक, विद्यार्थिनी एका वृद्ध व्यक्तीच्या संपर्कात असल्याची माहिती शाळा प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. गयानाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार गेराल्ड गौविया (Gerald Gouvia) यांनी सांगितले की, आरोपी मुलगी सुमारे 14 वर्षांची आहे. तीचा फोन हिसकावून घेतल्यानंतर तीने मुलींचे वसतिगृह पेटवून देण्याची धमकी दिली.

मात्र, आगीमुळे ती मुलगीही जखमी झाली असून, सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली जाणार आहे. त्याचवेळी रुग्णालयात दाखल इतर 9 जणांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

Tags

follow us