संभाजीराजे छत्रपती कोल्हापूर सोडणार? लोकसभेसाठी राज्यातील 4 मतदारसंघांचा विचार सुरु

संभाजीराजे छत्रपती कोल्हापूर सोडणार? लोकसभेसाठी राज्यातील 4 मतदारसंघांचा विचार सुरु

पुणे : आगामी लोकसभा निवडणूक संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) कुठून लढविणार? याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे. मात्र कोल्हापूर मतदारसंघातून लढणार नसल्याचे संकेत स्वतः संभाजीराजे छत्रपती यांनी दिले आहे. कोल्हापूर ऐवजी त्यांनी राज्यातील अन्य 4 मतदारसंघामधून आग्रह आहे, त्यामुळे त्याबाबत विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. स्वराज्य संघटनेच्या मुख्य कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आणि पहिले अधिवेशन पार पडल्यानंतर त्यांनी आज (शनिवारी) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीवर भाष्य केले. (Sambhajiraje Chhatrapati will Contest Lok Sabha election form Nashik, Nanded or Dharashiv Constituncy)

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, स्वराज्य संघटना विधानसभा निवडणूक लढविणार हे नक्की आहे. लोकसभेसाठी पक्षाची चाचपणी सुरु आहे. त्यामुळे लोकसभेसाठीचे चित्र स्पष्ट नाही. समविचारी कोणी सोबत आले तर त्यांच्यासोबत जाऊ. संभाजीराजे छत्रपती कुठून निवडणूक लढविणार असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, कोल्हापूर ही माझी कर्मभूमीच आहे. त्यामुळे तिथून तर आग्रह आहेच. पण अन्य ठिकाणांहून देखील लोकांचे प्रेम मिळत आहे.

संभाजीराजे छत्रपतींचे सक्रिय राजकारणात आणखी एक पाऊल; फटका कोणत्या पक्षाला बसणार?

मला नाशिक, नांदेड, धाराशिव आणि परभणीच्या लोकांनी निवडणूक लढविण्यासाठी आग्रह केला आहे. त्यामुळे मी स्वतः निवडणूक कुठून लढायची, लोकसभा लढवायची की नाही, मुळात निवडणूक लढवायची की नाही याबाबत संभ्रमात आहे. मला दिल्ली आणि महाराष्ट्र दोन्ही आवडतो. त्यामुळे लोकसभा किंवा विधानसभा दोन्ही निवडणुका लढवू शकतो. पण मी खासदार आमदार नसलो तरी चालेल, सत्तेसाठी सगळं करत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात स्वराज्यच्या कार्यालयाचे लोकार्पण :

संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यातून ‘स्वराज्य’ संघटनेचं रणशिंग फुंकलं. पुण्यातील शिवाजीनगरला ‘स्वराज्य’ संघटनेच्या ‘स्वराज्य भवन’ या मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आज (शनिवारी) पार पडला. यानंतर बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘स्वराज्य’ संघटनेचे पहिले अधिवेशनही पार पडले. यावेळी अधिवेशनात संघटनेचे काही ठराव मंजूर करण्यात आले.

‘स्वराज्य’ : नावातच ताकद; कोणाच्याही दारात जाणार नाही! पहिल्याच अधिवेशनातून संभाजीराजेंनी फुंकलं

या अधिवेशनात स्वराज्य संघटना राज्यातील सर्व निवडणुका लढविणार असल्याचा ठराव करण्यात आला. याशिवाय संघटना कोणत्याही राजकीय पक्षाकडे युतीचा प्रस्ताव घेऊन जाणार नाही. समविचारी पक्ष सोबत आले तर युती करणार असे काही ठराव या अधिवेशनात मंजूर करण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube