‘स्वराज्य’ : नावातच ताकद; कोणाच्याही दारात जाणार नाही! पहिल्याच अधिवेशनातून संभाजीराजेंनी फुंकलं रणशिंग
पुणे : संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पुण्यातून ‘स्वराज्य’ संघटनेचं रणशिंग फुंकलं. पुण्यातील (Pune) शिवाजीनगरला ‘स्वराज्य’ संघटनेच्या ‘स्वराज्य भवन’ या मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आज (शनिवारी) पार पडला. यानंतर बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘स्वराज्य’ संघटनेचे पहिले अधिवेशनही पार पडले. यावेळी अधिवेशनात संघटनेचे काही ठराव मंजूर करण्यात आले.
स्वराज्य संघटना पूर्ण ताकतीने राज्याच्या राजकरणात आणि सत्तेत उततरणार
या अधिवेशनात स्वराज्य संघटना राज्यातील सर्व निवडणुका लढविणार असल्याचा ठराव करण्यात आला. याशिवाय संघटना कोणत्याही राजकीय पक्षाकडे युतीचा प्रस्ताव घेऊन जाणार नाही. समविचारी पक्ष सोबत आले तर युती करणार असे काही ठराव या अधिवेशनात मंजूर करण्यात आले.
संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले?
यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले,
एक वर्षापूर्वी स्वराज्य संघटनेची घोषणा केली. आठ महिन्यापासून महाराष्ट्रभर स्वराज्य संघटनेची बांधणी सुरु आहे. स्वराज्याची सुरुवात कुठून करायची हा प्रश्न होता. कोल्हापूर, पुणे की मुंबई नेमकी कुठून सुरु करायची, असा संभ्रम होता. मग विचार केला आई तुळजाभवानी जी आपली कुलस्वामिनी आहे, त्या देवीच्या गाभाऱ्यातूनच संघटनेचा प्रारंभ करु आणि स्वराज्यच्या पहिल्या शाखाचे तुळजापूरला उद्घाटन झाले.
संभाजीराजे छत्रपतींचे सक्रिय राजकारणात आणखी एक पाऊल; फटका कोणत्या पक्षाला बसणार?
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेचे बीज पुण्यात रोवले. त्यामुळे संघटनेचे मुख्य कार्यालयही पुण्यात आहे. स्वराज्यचा उद्देश म्हणजे “गाव तिथे शाखा आणि घरोघरी स्वराज्य” असा आहे. उनं, पावसाळा, थंडी न पाहता स्वराज्य संघटना वाढविण्याची गरज आहे. वर्षानुवर्षे राजकारणात साचलेपणा आला आहे. त्यामुळे नेते माजले आहेत. तेच राजकारणी, तीच चर्चा, तेच खोटे बोलणे सुरु आहे. त्यामुळे स्वराज्याच्या माध्यमातून जनजागृती करुन सर्वसामान्यांना ताकद द्यायची आहे.
CM शिंदे 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर; जागा वाटप अन् मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं गंगेत न्हाणार?
स्व म्हणजे काय तर डॉक्टर, कामगार, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी हे जे तुम्ही आहात. हे राज्य तुमचे आहे. हे माजलेले राजकीय लोक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज यांचे नाव घेतात, राजकारण करतात, पण ते खरंच महाजारांचा विचार घेऊन चालतात का? हा विचार करण्याची गरज आहे. अनेकांनी मला स्वराज्यचा लोगो काय असणार असे विचारले, ब्रीद वाक्य काय असणार विचारले. पण स्वराज्य नावातच ताकद, ब्रीद वाक्य अन् बोधचिन्हाची गरज नाही. हे तुमचं स्वराज्य आहे. स्वराज्याचे पाचसूत्री कार्यक्रम घेऊनच सामान्य लोकांचा विकास करायचा आहे, असेही संभाजीराजे म्हणाले.