द पीस प्रेसिडेंट! नोबेल पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी ट्रम्प यांना नवी पदवी? नेमकं चाललंय काय…

अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प हे 2025 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी प्रमुख दावेदारांमध्ये आहेत.

America Donald Trump (1)

America Donald Trump (1)

The Peace President Donald Trump : अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प हे 2025 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी प्रमुख दावेदारांमध्ये आहेत. गेल्या काही वर्षांपासून ट्रम्प यांनी स्वतःला जगभरातील शांततेचे दूत म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, त्यांनी जगातील किमान सात मोठ्या युद्धांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची भूमिका बजावली आहे. विशेषतः त्यांनी भारत आणि पाकिस्तान दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या चार दिवसांच्या संघर्षाचा उल्लेख करून त्यावेळी आपली मध्यस्थी निर्णायक ठरल्याचे म्हटले आहे.

भारताने ट्रम्पचा दावा फेटाळला

ट्रम्प यांनी (Donald Trump) भारत आणि पाकिस्तानमधील (Ind Vs Pak) तणाव कमी करण्याचे प्रयत्न केल्याचा वारंवार दावा केला आहे. त्यांनी असे सांगितले की, त्यांनी किमान 60 वेळा भारत-पाकिस्तान संघर्ष शांत करण्यासाठी हस्तक्षेप केला. भारताने (Nobel Peace Prize 2025) हे सर्व दावे पूर्णतः नाकारले आहेत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लोकसभेच्या पटलावरून ट्रम्प यांचे दावे फेटाळले (White House Tweet) आहेत.

नोबेल पुरस्कारासाठी जागतिक पातळीवर समर्थन

अमेरिकेतील रिपब्लिकन नेते ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात यावा, या मताचे समर्थक आहेत. केवळ अमेरिकेतच नव्हे, तर जगभरातील काही देशांनीही ट्रम्प यांच्या उमेदवारीस पाठिंबा दिला आहे. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, पाकिस्ताननेही ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी समर्थन दिल्याचे वृत्त आहे.

द पीस प्रेसिडेंट

नोबेल शांतता पुरस्काराच्या घोषणेला फक्त एक दिवस शिल्लक असताना, व्हाइट हाऊसकडून द पीस प्रेसिडेंट ही उपाधी देण्यात आली आहे. त्यामुळे हा निर्णय राजकीय डावपेचाचा भाग असल्याचं विश्लेषकांचं मत आहे. ट्रम्प यांनी स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरTHE PEACE PRESIDENT” असे मोठ्या अक्षरांत लिहून एक पोस्ट शेअर केली, ज्यामुळे अमेरिकन राजकारणात आणि जागतिक माध्यमांमध्ये या घोषणेची मोठी चर्चा रंगली आहे.

Exit mobile version