Download App

पाकिस्तानला मदत अन् भारताला विरोध, तुर्कीचे ‘आशिया वन’ धोरण भारतासाठी धोका का?

Turkey Asia Anew Policy : ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) वाढणारा लष्करी

Turkey Asia Anew Policy : ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) वाढणारा लष्करी तणाव आता जवळपास शांत झाला आहे. 7 ते 10 मे दरम्यान पाकिस्तानकडून हवाई हल्ले करण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र भारताने आपल्या एअर डिफेन्स सिस्टमने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तर दुसरीकडे भारतावर हल्ले करण्यासाठी पाकिस्तानला तुर्कीने (Turkey) मदत केली असल्याची माहिती देखील समोर आली आहे.  भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावादरम्यान तुर्कीने ज्याप्रकारे पाकिस्तानला मदत केली त्यामुळे संपूर्ण जगात तुर्कीचे ‘एशिया अनेव’ (Asia Anew) धोरणाची चर्चा होत आहे.

तुर्कीचे ‘एशिया अनेव’ धोरण काय ?

‘एशिया अनेव’ धोरणानुसार तुर्की आशिया खंडातील इस्लामिक देशांशी संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. तुर्की या धोरणांतर्गत भारतच्या शेजारील देशांसोबत म्हणजेच पाकिस्तान, बांगलादेशसोबत धोरणात्मक आणि संरक्षण सहकार्य वाढत आहे. ज्यामुळे भारताच्या प्रादेशिक रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पाकिस्तानला मदत

जगातील अनेक देशांनी जेव्हा पाकिस्तानला शस्त्रे विकणे बंद केले तेव्हा चीन आणि तुर्कीने पाकिस्तानला मदत केली. माहितीनुसार, सध्या पाकिस्तान चीन आणि तुर्कीकडून अत्याधुनिक शस्त्रे खरेदी करत आहे. तर दुसरीकडे तुर्कीने भारताला शस्त्रास्त्रे विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. 10 जुलै 2024 रोजी तुर्की संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या बैठकीत संरक्षण विभागाचे अधिकारी मुस्तफा मुरत सेकीर यांनी अनवधानाने हे मान्य केले तेव्हा ही माहिती समोर आली होती.

तुर्कीची शस्त्रे धोकादायक का आहेत?

माहितीनुसार, तुर्कीकडे शस्त्रे आधुनिक आणि लढाईत प्रभावी आहे. अझरबैजान-आर्मेनिया युद्ध आणि रशिया-युक्रेन संघर्षात त्यांची प्रभावी भूमिका दिसून आली आहे. म्हणूनच तुर्कीचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा भारतासाठी अधिक धोकादायक ठरू शकतो.

GST विभागाकडे असलेली करदात्याची गोपनीय माहितीची होतेय गळती, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप 

तुर्की आणि पाकिस्तानचे सायबर कट

तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, तुर्की पाकिस्तानला लष्करी मदतीबरोबर सायबर युद्धासाठी देखील तयार करत आहे. भारत आणि अमेरिकेवर डिजिटल हल्ले करणे,  पाकिस्तानवरील टीका रोखणे या उद्देशाने तुर्कीने पाकिस्तानला एक गुप्त सायबर आर्मी तयार करण्यास मदत करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता तुर्कीचे ‘आशिया वन’ धोरण आता भारताच्या सुरक्षेसाठी एक गंभीर आव्हान बनले आहे. तुर्की केवळ भारताच्या शत्रूंनाच बळकटी देत नाही तर लष्करी, डिजिटल आणि वैचारिक आघाड्यांवर छुपे युद्धही करत आहे.

follow us