Download App

मोठी बातमी : तुर्कीतील रिसॉर्टला भीषण आग, 66 जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर

Turkey Ski Resort Fire Update : तुर्कीमध्ये एका हॉटेलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर-पश्चिम तुर्कीमधील (Turkey) स्की रिसॉर्ट हॉटेलमध्ये आग लागली. यामध्ये 66 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण भाजले असल्याची माहिती (Fire Update) मिळतेय. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आग नेमक्या कोणत्या कारणाने लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही. घटनेचा तपास केला जातोय.

नगरकरांचा बोलबाला! ‘या’ पठ्ठयांनी खरेदी केले कोटींचे हेलिकॉप्टर

बोलू प्रांतातील कार्तलकाया रिसॉर्टमधील 12 मजली ग्रँड कार्टल हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये पहाटे साडे तीन वाजता आग लागली, असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. आग लागण्याचे नेमकं कारण तपासलं (Turkey Fire Update) जातंय. पीडितांपैकी दोन जणांनी घाबरून इमारतीवरून उडी मारली, यातच त्यांचा मृत्यू झाला असं गव्हर्नर अब्दुलअजीझ आयदिन यांनी सरकारी अनादोलू एजन्सीला सांगितलंय. काही लोकांनी चादरी आणि ब्लँकेट वापरून त्यांच्या खोल्यांमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला, असल्याची माहिती देखील स्थानिक मीडियाने दिली आहे.

आगीच्या घटनेचा तपासाचे नेतृत्व करण्यासाठी सरकारने सहा सरकारी वकिलांची नियुक्ती केलीय. इस्तंबूलच्या पूर्वेस सुमारे 300 किमी अंतरावर कोरोग्लू पर्वतरांगांमध्ये कार्तलकाया हे एक लोकप्रिय स्की रिसॉर्ट आहे. आयदिनच्या कार्यालयाने सांगितले की, घटनास्थळी 30 अग्निशमन ट्रक आणि 28 रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. आगीची घटना घडली तेव्हा, हॉटेलमध्ये 234 लोकं उपस्थित असल्याचं सांगितलं जातंय.

Datta Khade Exclusive : कराडमुळे गोत्यात आलेल्या खाडेंनी ‘CID’ अधिकाऱ्यांना सगळं सांगितलं!

आग लागल्यानंतर काही लोकांनी पत्र्याच्या साहाय्याने आपल्या खोलीच्या खिडक्यांमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. हॉटेलचे प्रशिक्षक नेकेमी केपसेतुटन यांनी सांगितले की, आग लागली तेव्हा तो झोपला होता. त्याने इमारतीबाहेर धाव घेतली. यानंतर त्याने सुमारे 20 जणांना हॉटेलमधून बाहेर पडण्यास मदत केली. हॉटेल धुराने वेढले गेले होते. त्यामुळे आगीपासून वाचणं कठीण झालं होतं. हॉटेलच्या बाहेरील लाकडामुळे आग पसरण्याचा वेग वाढला असावा, असे सांगण्यात येत आहे.

 

follow us