Rishi Sunak Educational Qualification : ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक पुन्हा (Rishi Sunak) एकदा चर्चेत आले आहेत. त्यांची चर्चा होण्यामागे कारणही खास आहे. खासदार असतानाही ऋषी सुनक नोकरी करत आहेत. त्यांनी गोल्डमन सॅश नावाच्या इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनीत सल्लागार म्हणून जॉईन केले आहे. त्यांची ही नोकरी पार्ट टाइम असेल. यामध्ये सुनक जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्था या मुद्द्यांवर बँकेच्या ग्राहकांना सल्ला देण्याचे काम करतील. याचवेळी ते खासदार म्हणूनही काम पाहतील. पण एक माजी पंतप्रधान आणि सध्या खासदार असतानाही ऋषी सुनक यांना नोकरी करण्याची गरज का पडली, सुनक नेमके किती शिकलेले आहेत, त्यांच्याकडे किती पदव्या आहेत या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या..
12 मे 1980 रोजी इंग्लंड मधील सौथामप्टन येथे जन्मलेले ऋषी सुनक यांचे वडील यशवीर सुनक एक जनरल फिजिशियन होते. त्यांची आई उषा या केमिस्ट म्हणून काम करत होत्या. 1960 च्या दशकात त्यांचे कुटुंब ब्रिटनमध्ये स्थायिक झाले होते. सुनक यांचे शिक्षण ब्रिटनमध्येच झाले आहे.
ब्रिटनमध्ये ‘सुनक’राज संपुष्टात! कंजर्वेटिव्ह पक्षाचा दणदणीत पराभव; लेबर पार्टीला बहुमत
मिडिया रिपोर्ट्सनुसार त्यांच्या एका शिक्षकाने सांगितले की ऋषी सुनक एक शांत विद्यार्थी होते. त्यांनी कधीच कुणाला तक्रारीची संधी दिली नाही. ऋषी सुनक यांचे सुरुवातीचे शिक्षण हम्पशायर येथील स्ट्राउड शाळेतून झाले होते. यानंतर ते विंचेस्टर कॉलेजमध्ये गेले जे एक बोर्डिंग स्कूल आहे. यानंतर त्यांनी पुढील शिक्षण ऑक्सफर्डचे लिंकन कॉलेजमधून पूर्ण केले.
ऋषी सुनक यांनी दर्शनशास्त्र, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयांचे शिक्षण घेतले. यानंतर सन 2006 मध्ये फुलब्राईट स्कॉलरच्या रूपात स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले होते. काही वर्षांपूर्वी द गार्डियनमध्ये एक वृत्त झाले होते. ज्यातज दावा करण्यात आला होता की सुनक यांच्या कॉलेजमध्ये जे त्यांचे क्लासमेट होते आणि प्राध्यापक होते त्यातील अनेकांना ऋषी सुनक यांची ओळख राहिलेली नाही. त्यांना सुनक यांच्याबद्दल काही माहिती नसल्याचे दिसून आले. याचे कारण म्हणजे त्यावेळी एकाच वर्गात 400 विद्यार्थी होते त्यामुळे प्रत्येकाला लक्षात ठेवणे कठीण होते. दुसरे महत्वाचे म्हणेज ऋषी सुनक स्वभावाने शांत होते त्यांनी कोणते मोठे अवॉर्डही जिंकलेले नव्हते.
दरम्यान, इंफोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या मुलीशी ऋषी सुनक यांचा विवाह झालेला आहे. दोघांची पहिली भेट स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत एमबीएच्या शिक्षणादरम्यान झाली होती. यानंतर सन 2009 मध्ये त्यांनी लग्न केले. ऋषी सनुक यांना दोन मुली आहेत. कृष्णा आणि अनुष्का अशी या मुलींची नावं आहेत.
‘जी-7’ परिषद! पंतप्रधान मोदींची माक्राँ, सुनक, झेलेन्स्की यांच्याशी चर्चा; पोप फ्रोन्सिस यांचीही भेट