Download App

युक्रेनचा मोठा निर्णय; भारतातच देता येणार मेडिकलची अंतिम परीक्षा

Ukraine Medical Exam: रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) गेल्या वर्षापासून युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परतावे लागले होते. आता युक्रेन सरकारने मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Medical Students) मोठा दिलासा दिला आहे. युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतातच अंतिम परीक्षा देता येणार आहे. युक्रेनच्या उप परराष्ट्र मंत्री एमिने झापारोवा 10 ते 12 एप्रिल दरम्यान भारत दौऱ्यावर होत्या. भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर बुधवारी (१२ एप्रिल) मंत्री म्हणाल्या की युक्रेन परदेशी वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या देशातून अंतिम परीक्षा देण्याची परवानगी देईल.

एमीन झापरोवा पुढं म्हणाल्या की, गेल्या वर्षी रशियन आक्रमणानंतर युक्रेनमधून आलेले हजारो वैद्यकीय विद्यार्थी आता त्यांची अंतिम किंवा पात्रता परीक्षा भारतात देऊ शकतील. त्या म्हणाल्या की 2,000 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये परतले आहेत आणि त्यापैकी बहुतेक देशाच्या पश्चिम भागातील वैद्यकीय विद्यापीठांमध्ये आहेत. गेल्या वर्षी 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर, भारताला भेट देणारे जापरोवा हे त्या देशातील पहिल्या नेत्या आहेत.

Delhi Corona Update : राजधानी दिल्लीत कोरोनाचा उद्रेक…

एमीन झापरोवा आणि परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) संजय वर्मा यांच्यात भारतीय विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत चर्चा झाली आहे. युक्रेनमधील युद्धामुळे या विद्यार्थ्यांचा अभ्यास थांबला होता. बुधवारी परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर युक्रेनच्या मंत्र्यांनी नमूद केले की युक्रेन परदेशी वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या देशातून परीक्षा देण्याची परवानगी देईल.

एमीन झापरोवा यांनी सांगितले की, हे विद्यार्थी ऑनलाइन वर्गांना उपस्थित राहू शकतात आणि सुरक्षेच्या कारणांमुळे युक्रेनला परत न जाता भारतात पात्रता किंवा अंतिम परीक्षेला बसणे निवडू शकतात. “मला वाटते की युद्धाचे संपल्यानंतर आमच्याकडे आणखी विद्यार्थी परत येतील, परंतु युद्धाच्या मध्यभागी युक्रेनमधून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आम्ही खरोखरच सर्वतोपरी प्रयत्न केले,” असे त्या म्हणाल्या.

Tags

follow us