Download App

डोनाल्ड ट्रम्प यांची चीनवर वक्रदृष्टी! 100 टक्के टॅरिफची नाटोकडे मागणी; चीनचेही तिखट उत्तर

ट्रम्प यांनी चीनवर हल्लाबोल करत नाटो देशांनी चीनवर 50 ते 100 टक्के टॅरिफ आकारावा अशी मागणी केली आहे.

Donald Trump China Tariff : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची वक्रदृष्टी पुन्हा चीनकडे वळली आहे. अमेरिकेने चीनवर टॅरिफ लादल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले होते. मात्र मध्यंतरीच्या काळात तणाव काहीसा कमी झाला होता. परंतु, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या मागणीने चीनचा तिळपापड झाला आहे. ट्रम्प यांनी चीनवर हल्लाबोल करत नाटो देशांनी चीनवर 50 ते 100 टक्के टॅरिफ आकारावा अशी मागणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर चीनने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. चीन युद्धाच्या कोणत्याही षडयंत्रात सहभागी नाही आणि अशा गोष्टीत कधी भागही घेत नाही असे प्रत्युत्तर चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी दिले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 50 ते 100 टॅरिफ आकारावा (Donald Trump) अशी मागणी नाटो देशांकडे केली आहे. तसेच नाटो देशांनी रशियाकडून तेल खरेदी बंद करावी आणि रशियावर कठोर निर्बंध लादावेत असे म्हटले होते. नाटो देश अजूनही रशियाकडून तेल खरेदी करत आहेत. त्यामुळे परिस्थिती बिघडत आहे. नाटो देशांनी एकत्र येत ठोस निर्णय घेईपर्यंत अमेरिका रशियावर व्यापक प्रमाणात निर्बंध लादणार नाही असा इशाराही ट्रम्प यांनी दिला.

China : खोटं बोललात तर अकाउंट बंद! चीनच्या जिनपिंग सरकारचा कठोर नियम; काय होणार?

चीनचेही तिखट उत्तर 

ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी प्रत्युत्तर दिले. वांग यी सध्या स्लोवेनियाच्या दौऱ्यावर आहेत. कोणत्याही समस्येचं उत्तर युद्ध नाही. निर्बंधांमुळे परिस्थिती आणखी जटील होते. चीन कोणत्याही युद्धाचं कारस्थान कधीही रचत नाही त्यात कधी भागही घेत नाही असे यी म्हणाले. अमेरिकेचं नाव न घेता त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांचा रोख अमेरिकेकडेच होता.

याआधी अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणत भारताने टॅरिफ (India US Tariff War) लादला आहे. चीनवर मात्र टॅरिफ आकारण्याचा विचार अमेरिकेने केलेला नव्हता. जी 7 देशांनी आता भारत आणि चीनवर (India China Relation) दबाव वाढवावा असे ट्रम्प सरकारला वाटत आहे. कारण हे दोन्ही देश रशियाकडून (Russian Oil) मोठ्या प्रमाणात तेल आणि अन्य ऊर्जा उत्पादने खरेदी करतात.

मोदींचा मास्टरस्ट्रोक! चीन-रशियासोबत आघाडी, आता डोनाल्ड ट्रम्पची दादागिरी चालणार नाही 

जी 7 अर्थमंत्र्यांच्या बैठकीत अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी सांगितले की जोपर्यंत तेल विक्रीतून रशियाला मिळणारा पैसा थांबला जात नाही तोपर्यंत पुतिन यांची युद्धाची इच्छा थांबवली जाऊ शकत नाही. त्यामुळे सर्व देशांनी एकत्रित येऊन ठोस पावले उचलावीत असे आवाहनही त्यांनी केले.

follow us