Download App

4 भारतीय कंपन्यांसह तब्बल 400 संस्थांवर अमेरिकेने घातली बंदी, ‘हे’ आहे कारण

US Sanctions On 400 Companies : गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia and Ukraine War) सुरु आहे. यातच रशिया विरोधात

  • Written By: Last Updated:

US Sanctions On 400 Companies : गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia and Ukraine War) सुरु आहे. यातच रशिया विरोधात भूमिका घेत अमेरिकेने (US) मोठा निर्णय घेत तब्बल 400 संस्थांवर निर्बंध लादले आहेत. यात चार भारतीय कंपन्यांच्या (Indian Companies) नावांचाही समावेश असल्याची माहिती यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या (US Sanctions) एका अधिकाऱ्याने दिली आहे.

याबाबत यूएस स्टेट डिपार्टमेंटने म्हटले आहे की, या युद्धामध्ये रशियाला मदत करणाऱ्या सुमारे 400 संस्था आणि व्यक्तींवर निर्बंध लादत आहोत.यामध्ये 120 हून अधिक व्यक्ती आणि कंपन्यांवर बंदी समाविष्ट आहे. यामध्ये वाणिज्य विभागाकडून 40 कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कंपन्यांमध्ये ‘असेंड एव्हिएशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ आहे, ज्याने मार्च 2023 ते मार्च 2024 दरम्यान रशियन कंपन्यांना 700 हून अधिक वस्तू पाठवल्या आहेत.

या वस्तूंमध्ये अमेरिकन विमानांचे भाग समाविष्ट होते, ज्याची किंमत $200,000 पेक्षा जास्त आहे. याशिवाय ‘मास्क ट्रान्स’ नावाच्या आणखी एका कंपनीचाही उल्लेख करण्यात आला आहे, जी रशियाच्या S7 इंजिनिअरिंगला $300,000 किमतीचे विमानाचे भाग पाठवण्यात गुंतलेली आहे. अमेरिकेने ‘TSMD ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘फुट्रेवा’ सारख्या कंपन्यांवर देखील निर्बंध लादले आहे. या कंपन्यांनी रशियन कंपन्यांना इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा पुरवठा केला आहे. ज्यांची किंमत 1.4 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

अमेरिकेने दिलेल्या माहितीनुसार, युद्धात रशियाची मदत थांबवणे हा या निर्बंधांचा उद्देश आहे. त्यामुळे रशिया तिसऱ्या देशांकडून तंत्रज्ञान आणि वस्तू खरेदी करू शकत नाही जे त्यांच्या युद्धाच्या प्रयत्नांना मदत करू शकतात. असं अमेरिकेकडून सांगण्यात येत आहे.

निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार टिंगरे अडचणीत? पोर्शे कार अपघातात मृत्युमुखी तरुण तरुणीचे पालक कोर्टात जाणार

तर दुसरीकडे नोव्हेंबर 2023 मध्ये, ‘Si2 Microsystems’ ला रशियन सैन्याला अमेरिकन वस्तू पुरवण्यावर बंदी घालण्यात आली होती. अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी अलीकडेच इशारा दिला की, रशियाविरुद्ध जागतिक निर्बंधांचे उल्लंघन करणारी कोणतीही भारतीय कंपनी त्याच्याशी संबंधित “परिणामांसाठी” तयार राहावे. ते म्हणाले की भारत-अमेरिका संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहेत, परंतु असे म्हणता येणार नाही की ते काही “सिस्टन्स” शिवाय आहेत.

follow us