Download App

वॉलमार्टचा चीनला मोठा धक्का, आयातीसाठी भारताला दिले प्राधान्य

Walmart : अमेरिकेतील (America) आघाडीची रिटेल कंपनी (Retail Company) वॉलमार्ट (Walmart) आता भारतातून अधिकाधिक वस्तू आयात करत आहे. वॉलमार्ट वस्तूंच्या आयातीसाठी चीनवरील (China) अवलंबित्व कमी करत आहे. पुरवठा साखळी सुधारण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी कंपनी चीनवरील अवलंबित्व कमी करून भारतातून आयात वाढवत आहे.

वॉलमार्ट ही जगातील सर्वात मोठ्या रिटेल कंपन्यांपैकी एक आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, 2023 मध्ये जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत कंपनीने अमेरिकेत केलेल्या आयातीपैकी एक चतुर्थांश आयात भारतातून केली आहे. तर 2018 मध्ये ते फक्त 2 टक्के होते. जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान चीनमधून आयात 60 टक्क्यांवर आली आहे, जी 2018 मध्ये 80 टक्के होती.

वॉलमार्टने भारतातून आयात वाढवली असली तरी वॉलमार्ट सध्या सर्वाधिक वस्तू चीनमधून आयात करते. चीनमधून आयात खर्च वाढल्याने तसेच अमेरिका आणि चीनमधील वाढत्या राजकीय तणावामुळे वॉलमार्टसारख्या कंपन्या भारत, थायलंड आणि व्हिएतनाममधून अधिक माल आयात करत आहेत.

साठ वर्षांनंतर मणिपुरात शांतता; CM बिरेन स‍िंह यांच्याकडून मोदी, शाहांचे आभार

वॉलमार्टच्या कार्यकारी उपाध्यक्ष अँड्रिया ऑलब्राइट म्हणाल्या, आम्हाला सर्वोत्तम किंमती हवी आहेत. मालाच्या आयातीसाठी आपण केवळ एका पुरवठादारावर किंवा एका प्रदेशावर अवलंबून राहू शकत नाही. त्या पुढे म्हणाले की, भारत उत्पादन क्षमता निर्माण करण्यासाठी वॉलमार्टसाठी एक प्रमुख घटक म्हणून उदयास आला आहे. वॉलमार्ट भारतातून खेळणी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून सायकल आणि औषधांपर्यंत सर्व काही आयात करते. याशिवाय वॉलमार्ट धान्य आणि पास्ताही आयात करते.

UNLF Signs Peace Accord : मणिपूरचा सर्वात जुन्या बंडखोर गट UNLF ने हिंसा सोडली; शांतता करारावर केली सही

देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमध्ये वॉलमार्टची 77 टक्के भागीदारी आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की 2027 पर्यंत ती भारतातून दरवर्षी 10 अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात करेल. वॉलमार्ट सध्या 3 अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात करत आहे.

Tags

follow us