Ukraine Britain Deal : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी (Volodymyr Zelenskyy) अमेरिकेनंतर ब्रिटनचा दौरा केला. अमेरिका दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प आणि (Donald Trump) झेलेन्स्की यांच्यात जोरदार वाद झाले. परंतु, ब्रिटन दौरा त्यांच्यासाठी फायद्याचा राहिला. युक्रेन आणि ब्रिटेनने शनिवार 2.26 बिलियन पाउंड म्हणजेच 2.48 अब्ज रुपयांच्या लोन अॅग्रीमेंटवर सह्या केल्या. यामुळे युक्रेनला मोठा दिलासा मिळाला आहे. इतकेच नाही तर संपूर्ण ब्रिटेन युक्रेनच्या पाठीशी आहे असा विश्वासही पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी झेलेन्स्की यांना दिला.
रशियाची ज्या (Russia Ukraine War) संपत्तीवर निर्बंध टाकले आहेत त्यातून जो फायदा होईल त्या पैशांतून हे कर्ज दिले (Loan) जाणार आहे. या करारावर ब्रिटनच्या चांसलर रेचेल रिव्स आणि युक्रेनचे अर्थमंत्री सर्गी मार्चेन्को (Ukraine Crisis) यांनी सह्या केल्या. कर्जाचा पहिला हप्ता पुढील आठवड्यात युक्रेनला मिळण्याची शक्यता आहे.
झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात वादावादी झाली. त्यामुळे या दौऱ्यात अपमानित होऊन झेलेन्स्की यांना परतावे लागले. परंतु, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर (Keir Starmer) यांनी मात्र झेलेन्स्कींचे शानदार स्वागत केले. युक्रेन बरोबर आम्ही मजबूतीने उभे आहोत असेही स्टार्मर म्हणाले. दोन्ही नेत्यांची बैठक युरोपीय शिखर संमेलनाच्या आधी झाली. या बैठकीत युक्रेन शांती प्रस्तावावर चर्चा होणार आहे.
स्टार्मर यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार युरोपीय शिखर संमेलन आज होणार आहे. या बैठकीत युरोपकडून रक्षा सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. या संमेलनाच्या आधी दोन्ही नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच युक्रेनला मदतीचे आश्वासनही ब्रिटनकडून मिळाले. अमेरिककडून अशी वागणूक मिळाल्यानंतर युरोपीय देशही युक्रेनचा बॉयकॉट करतील अशी अपेक्षा होती. परंतु, बहुतांश युरोपीय देशांनी युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ट्रम्प यांच्याशी रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा करण्यासाठी झेलेन्स्की व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले होते. पण दोन्ही नेत्यांमध्ये असे काहीतरी घडले जे इतिहास कधीही विसरणार नाही. दोन्ही नेत्यांमधील भेटीची सुरुवात निश्चितच औपचारिक भेटीने झाली पण ती अपेक्षेप्रमाणे संपली नाही. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात साध्या संभाषणापासून सुरू झालेले संभाषण गरमागरम वादविवादात रूपांतरित झाले. जेव्हा दोघांमधील वाद वाढला तेव्हा अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी आपला सूर कठोर करत झेलेन्स्की यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु झेलेन्स्की काही केल्या थांबण्यास तयार नसल्याचे दिसून आले.
झेलेन्स्कीचा कॅमेऱ्यासमोर ट्रम्पशी वाद, अमेरिकेचा मोठा निर्णय, युक्रेनची आर्थिक मदत थांबणार?