Warren Buffett announces retirement : जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती, बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे (Warren Buffett) यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. वयाच्या ९४ व्या वर्षी बफे यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीसाठी खास मेन्यू; शिपी आमटी, पुरणपोळी अन् शेंगोळ्यांचा बेत
वॉरेन बफे यांनी कंपनीच्या वार्षिक भागधारकांच्या बैठकीत निवृत्तीची घोषणा केली. नुकतीच शेअरधारकांची बैठक घेतली. त्यात निवृत्तीची घोषणा केली. आता वेळ आलीये, या वर्षाच्या अखेरीस पदावरून निवृत्त होणार असं ते म्हणाले. त्यांची मुले हॉवर्ड आणि सुझी बफे यांनाच फक्त या निर्णयाची माहिती होती. स्टेजवर त्याच्या शेजारी बसलेल्या ग्रेग एबेल यांनाही पूर्व कल्पना नव्हती. त्यांच्या या घोषणेमुळे ४०,००० हून अधिक उपस्थित गुंतवणूकदारांनाच नाही तर जगाला धक्का दिला.
निवृत्तीनंतर बर्कशायर हॅथवेचा नवा उत्तराधिकारी कोण असेल याचीही वॉरेन बफे यांनी बैठकीत घोषणा केली. बफेट म्हणाले की, २०२१ पासून त्यांचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त झालेले कंपनीचे उपाध्यक्ष ग्रेग एबेल या वर्षाच्या अखेरीस सीईओ म्हणून पदभार स्वीकारतील. दरम्यान, ग्रेग एबेल यांच्या नियुक्तीकडे गुंतवणूकदार आणि उद्योग तज्ञांकडून सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.
ग्रेग एबेल हे ६२ वर्षांचे आहेत आणि २०१८ पासून बर्कशायरचे उपाध्यक्ष आहेत, ते बिगर-विमा व्यवसायाचे नेतृत्व करतात.
बफेट यांनी स्पष्ट केलंय की, ते बर्कशायर हॅथवेमध्ये भागधारक राहतील आणि सल्लागार भूमिकेत उपलब्ध असतील, परंतु सर्व निर्णय एबेलच्या हातात असतील. बर्कशायर हॅथवेचा एकही हिस्सा विकण्याचा माझा कोणताही हेतू नाही. मी शेवटी तो दान करेन, असं बफे म्हणाले.
यावेळी बफे यांनी अमेरिकेच्या व्यापार धोरणांवर, विशेषतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्कांवरही टीका केली. त्यांनी जागतिक व्यापार सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करत म्हटलं की, व्यापार हा राजकीय शस्त्र म्हणून वापरला जाऊ नये.
दरम्यान, बर्कशायर हॅथवेने अलीकडेच त्यांचा तिमाही उत्पन्न अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये कंपनीचा रोख साठा $३.४७ अब्जपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले आहे.