Download App

IPO : ‘नॉर्दर्न आर्क कॅपिटल’चा ‘IPO’ उद्यापासून खुली; महत्वाची अपडेट वाचा एका क्लिकवर

सोमवारपासून (ता. १६ सप्टेंबर) नॉर्दर्न आर्क कॅपिटल लि.ची प्राथमिक समभाग विक्री योजना खुली होत आहे. प्रत्येकी दहा रुपये दर्शनी मूल्य.

  • Written By: Last Updated:

Northern Arc Capital IPO :  नॉर्दर्न आर्क कॅपिटल लि.ची प्राथमिक समभाग विक्री योजना (आयपीओ) सोमवारपासून (ता. १६ सप्टेंबर) खुली होत आहे. या ‘आयपीओ’साठी १९ सप्टेंबरपर्यंत बोली लावता येईल. (IPO) प्रत्येकी दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक शेअरसाठी २४९ ते २६३ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.

Video: मला एका नेत्याकडून पंतप्रधान पदाची ऑफर; नितीन गडकरींचा खळबळ उडवणारा गौप्यस्फोट

किमान ५७ शेअरसाठी आणि त्यापेक्षा जास्त हवं असल्यास ५७ च्या पटीत बोली लावावी लागेल. या ‘आयपीओ’मध्ये ५०० कोटी रुपयांपर्यंतचे नवे शेअर आणि शेअरची विक्री करू इच्छिणाऱ्या शेअरधारकांकडून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या एक कोटी पाच लाख ३२ हजार ३२० शेअरचा समावेश आहे.

गड्या, आपला विदेशच बरा! पाच वर्षांत ८ लाख भारतीय विदेशात सेटल; देश सोडण्याची कारणंही धक्कादायक

‘आयपीओ’मधून मिळणाऱ्या निधीचा उपयोग भविष्यातील भांडवली आवश्यकता पूर्ण करण्यासह ‘एमएसएमई’ कर्जपुरवठा, वाहनकर्ज, परवडण्याजोग्या घरांसाठी कर्ज आणि शेतीसाठी कर्ज या क्षेत्रांसाठी तसंच आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भांडवल पर्याप्ततेच्या नियमांची पूर्तता करण्यासाठी केला जाणार असल्याचे कंपनीने म्हटलं आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज लि., अॅक्सिस कॅपिटल लि. आणि सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रा. लि. हे या आयपीओचं बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

follow us

संबंधित बातम्या