Download App

अमेरिका, युरोप, नाटो अन् एक टीव्ही शो.. युक्रेन-रशिया युद्धाचं नेमकं कारण तरी काय?

मेरिका आणि युरोप यांनी भरीस घातल्यानंतर युक्रेनने रशिया विरुद्ध युद्ध लढण्याची तयारी दाखवली. पण युद्धाचा निर्णय युक्रेनचा स्वतः चा होता.

Ukraine Russia War : अमेरिका आणि युरोप यांनी भरीस घातल्यानंतर युक्रेनने रशिया विरुद्ध युद्ध लढण्याची तयारी दाखवली. पण युद्धाचा निर्णय युक्रेनचा स्वतः चा होता. युक्रेनला हेही माहिती होतं की रशियासमोर आपला निभाव (Ukraine Russia War) लागणार नाही. तरी देखील युक्रेनने हा आत्मघाती निर्णय घेतला. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण यामागे एक टिव्ही शो आहे ज्याने दोन भावांना (रशिया आणि युक्रेन) एकमेकांचे कट्टर वैरी बनवले. खरंच असं घडू शकतं का एखादी टीव्ही मालिका दोन्ही देशांत युद्धाचं कारण ठरू शकते का? अमेरिका आणि युरोपमुळे युद्ध पेटलं का? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. मग आधी ही बातमी वाचा अन् तुम्हीच ठरवा.

जगातील एक मोठ्या गटाला आजही असं वाटतं की रशियाला कधीच युक्रेनशी युद्ध करायचं नव्हतं. दोन्ही देशांमध्ये चांगली मैत्री होती. आज जरी रशियावर युद्धखोरीचे आरोप केले जात असले तरी एकेकाळी मैत्री खातर रशियाने युक्रेनला क्रिमिया भेट म्हणून दिला होता. युक्रेनदेखील लहान भावाप्रमाणे रशियावर विश्वास करत होता. इतकेच नाही तर एका करारानुसार युक्रेनने आपल्याकडील अण्वस्त्रे देखील रशियाला दिली होती. मग असं असताना असं नेमकं काय घडलं की दोन्ही देश एकमेकांचे शत्रू झाले.

युक्रेनमध्ये रशियन भाषक जास्त

सन 1991 मध्ये सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर युक्रेन रशियापासून वेगळा झाला. परंतु युक्रेनमध्ये रशियन भाषक लोकांची संख्या जास्त होती. त्यामुळे या लोकांचा ओढा नेहमीच राशियाकडे राहिला. परंतु कालांतराने युक्रेनच्या पश्चिम भागात रशियाचा प्रभाव कमी होत गेला आणि पाश्चिमात्य देशांचा प्रभाव वाढत गेला.

बांगलादेशची भारताला विनंती, शेख हसीना यांना परत पाठवा, भारताकडून काय दिली प्रतिक्रिया?

2014 नंतर संबंध बिघडण्यास सुरुवात

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संबंध 2014 पर्यंत चांगले होते. पण ज्यावेळी युरोपियन युनियनने फ्री ट्रेड अॅग्रीमेंटवर सही करण्याची विचारणा युक्रेनला केली तेव्हा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांनी युरोपियन इकॉनॉमिक युनियन जॉईन देखील केली. या निर्णयाने युरोपियन युनियन युक्रेनवर नाराज झाला. नंतर मात्र युक्रेनला आपल्याकडे वळवण्यात युरोपियन युनियनला यश मिळालं.

युक्रेनच्या पश्चिम भागात सरकार विरुद्ध अनेक आंदोलने झाली. या आंदोलनांमागे अमेरिका आणि युरोप असल्याचे सांगितले गेले. या आंदोलनांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. यामुळे राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आपला जीव वाचवण्यासाठी त्यांना रशियाला शरण जावं लागलं. यानंतर पेट्रो पोरोशेंको राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी लगेच अमेरिका आणि युरोप धार्जिणे निर्णय घेण्यास सुरुवात केली.

त्यांनी सर्वात आधी फ्री ट्रेड अॅग्रीमेंटवर सही केली आणि जुना मित्र रशियाबरोबरच शत्रुत्व घेण्यास सुरुवात केली. यानंतर गॅस पाइपलाइनच्या मुद्द्यावर दोन्ही देशांत वादाला सुरुवात झाली. ही पाइपलाइन युक्रेनमार्गे युरोपमध्ये जाते. एका रिपोर्टनुसार रशिया याचे भाडे देखील देत होता. पण पेट्रो यांनी यावर 51 टक्के हिस्सेदारी मागितली.

यानंतर पुढे 2016 मध्ये दोन्ही देशांतील संबंध अतिशय खराब टप्प्यात पोहोचले. यावेळी युक्रेनने नाटोबरोबर एक असिस्टंट पॅकेज अॅग्रीमेंटवर सही केली. या माध्यमातून अब्जावधी डॉलर्सचे हत्यारे मिळाली होती. युक्रेनच्या मदतीने नाटो रशियाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होता. रशियाने अनेक वेळा पश्चिमी देशांना आवाहन केले होते की त्यांनी युक्रेनला नाटो संघटनेत सहभागी करून घेऊ नये. तरीही नाटोने युक्रेनला ग्रुप जॉईन करण्याची ऑफर दिली होती.

मोठी बातमी! यु्क्रेनचा रशियावर ९/११ सारखा हल्ला; इमारतींवर ड्रोन अटॅकने खळबळ Video

टीव्ही शोमुळे युद्धाला तोंंड फुटलं?

मग आता हा प्रश्न असा उपस्थित होतो की असे काय कारण आहे की ज्यामुळे युक्रेन युरोपच्या जाळ्यात अडकला आणि रशियाचा शत्रू झाला. याचं उत्तर म्हणजे एक किरकोळ टिव्ही मालिका असल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिका आणि युरोप युक्रेनला युद्धाच्या दरवाजापर्यंत घेऊन तर आलेच होते पण सर्व्हन्ट ऑफ द पीपल या युक्रेनच्या टिव्ही शोने युक्रेनला युद्धाच्या मैदानात आणले.

युक्रेनमध्ये सन 2015 मध्ये एक टिव्ही शो रिलीज झाला होता. या टिव्ही शोचं नाव सर्व्हंट ऑफ द पीपल असं होतं. एक आदर्श प्रेसिडेंट कसा असावा यावर हा शो भाष्य करत होता. ही सिरीज प्रचंड लोकप्रिय ठरली. पुढे यातील कलाकाराने याच नावाने एक राजकीय पक्ष काढला आणि थेट निवडणुकीत उडी घेतली. विशेष म्हणजे कलाकाराने निवडणूक जिंकली आणि देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले. हा कलाकार म्हणजेच आताचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमीर झेलेंस्की आहेत. त्यांनी सत्तेत येताच नाटो जॉईन करण्याची भाषा सुरू केली.

युक्रेन बर्बाद रशिया मात्र मालामाल

परंतु रशियाला या गोष्टीचा त्रास झाला आणि युद्धाला तोंड फुटलं. आज दोन वर्षे उलटून गेली तरी युद्ध सुरूच आहे. या युद्धात युक्रेनचं अतोनात नुकसान झालं आहे पण रशिया मात्र मालामाल झाला आहे. गेसेट फॅक्ट फ्लायनुसार रशियाने युक्रेनच्या मोठ्या भूभागावर कब्जा केला आहे. खाद्यपदार्थ, इंधन कंट्रोल करून युरोपला आपल्यासमोर झुकण्यास रशियाने भाग पाडलं आहे. रुबल या चलनाला पुन्हा मजबूत केलं आहे. तसेच आफ्रिकी देशांना हत्यारांची विक्री करून पैसे कमावले आहेत.

follow us