China News : चीनचे परराष्ट्र मंत्री गेल्या चार आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या अचानक गायब होण्याने चीनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पण चीन सरकार मौन बाळगून आहे. चीनच्या अशा मौनाला मोठा इतिहास आहे. चीनमध्ये राजकारणी आणि सेलिब्रिटी गायब होणे हे सामान्य झाले आहे. आतापर्यंत अनेक कलाकार, सेलिब्रेटी, उच्च अधिकारी, राजकीय नेते आणि पत्रकार बेपत्ता झाले आहेत. यातील अनेक लोक नंतर सापडले पण काही लोक बेपत्ताच राहिले. 2012 मध्ये राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी शी जिनपिंग हे दोन आठवडे बेपत्ता झाले होते.
चीनला स्वत:ला लोकशाही देश म्हणवत असला तरी जगभरात हुकूमशाही देश म्हणून ओळखला जातो. सध्या त्यांच्या सरकारने नागरिकांचे सर्व हक्क काढून घेतले आहेत. ते कोणत्याही मुद्द्यावर आपले म्हणणे मांडू शकत नाहीत, ना सत्तेला विरोध करू शकतात. त्यांच्याकडे गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जाते. उदाहरणार्थ, असे म्हटले जाते की राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार, चोरी आणि सार्वजनिक पैशाचा गैरवापर केला तर गायब होतात. खरे तर अशा शिक्षांमुळे चीनच्या जीडीपीचे तीन टक्के नुकसान होते. काही गोष्टी उलटही आहेत. उदाहरणार्थ, गुन्हा दडपण्यासाठी कधी कधी कायदाचा हत्यारासारखा वापर केला जातो.
विरोध केल्यानंतर थेट गायब झाले
चिनी कम्युनिस्ट पक्षाला कोणी विरोध केल्याचे आवडत नाही. असे करणारे लोक थेट गायब होतात. प्रसिद्ध टेनिसपटू पेंग शुई 2021 पासून बेपत्ता आहे. त्यांनी चीनच्या माजी उपपंतप्रधानांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. लोकशाही आणि भाषणस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आणि चिनी सरकारवर टीका करणारे आय वेईवेई नावाचे कलाकार अचानक गायब झाले होते. त्यांनी लंडनमधील रॉयल अकादमीमध्ये चीनवर टीका केली होती.
केसीआर यांचा महाराष्ट्रातील सहकारात शिरकाव; माजी आमदारासह BRS ला मिळाला पहिला साखर कारखाना
शी जिनपिंग यांच्यावर टीका केल्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती जॅक मा तीन वर्षे गायब झाले होते. जॅक मा हे अलीबाबा कंपनीचे संस्थापक आहेत. आता ते चीनमधील शाळांमध्ये मुलांना शिकवतात. अलीकडच्या काळात चीन सरकारने सेलिब्रिटींवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये जिनपिंग सरकारचा तर्क आहे की सेलिब्रिटी तरुणांची दिशाभूल करतात आणि कम्युनिस्ट पक्षाच्या आदर्शांपासून दूर ढकलतात. यामध्ये, अब्जाधीश फिल्म स्टार आणि पॉप गायक झाओ वेई 2021 मध्ये काही आठवडे बेपत्ता होते. त्याचे सोशल मीडिया अकाउंटही बंद करण्यात आले होते.
पुण्यातील प्रसिध्द हिल स्टेशन लवासा विकले, तब्बल 1800 कोटींना विक्री
चीनचे परराष्ट्र मंत्री बेपत्ता
गेल्या महिनाभरात अनेक परदेशी नेत्यांनी चीनला भेट दिली आहे. दरम्यान, परराष्ट्रमंत्री सर्वच मंचांवर अनुपस्थित राहिले आहे. परदेशात चीनचा चेहरा असलेल्या किन गँग 25 जूनपासून बेपत्ता आहे. ते अमेरिकेतील चीनचे राजदूत होते. नंतर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्वतः त्यांची डिसेंबरमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली. किन गँगबद्दल असे म्हटले जाते की ते चीनच्या राजकारणातील एक उदयोन्मुख चेहरा आहे.
11-12 जुलै रोजी जकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या दोन दिवसीय आसियान बैठकीच्या व्यासपीठावर ते अनुपस्थित राहिले. ते आजारी असल्याचा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे 24-25 जुलै रोजी होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेलाही ते उपस्थित राहू शकणार नाहीत.