केसीआर यांचा महाराष्ट्रातील सहकारात शिरकाव; माजी आमदारासह BRS ला मिळाला पहिला साखर कारखाना

केसीआर यांचा महाराष्ट्रातील सहकारात शिरकाव; माजी आमदारासह BRS ला मिळाला पहिला साखर कारखाना

अहमदनगर : महाराष्ट्रात ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या गळाला अहमदनगर जिल्ह्यातील बडा नेता लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणाऱ्या माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह मुरकुटे भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार आहेत. (Sharad Pawar’s close aid former MLA Bhanudas Murkute will join the Bharat Rashtra Samiti)

मुरकुटे यांच्यासोबत श्रीरामपुरमधील अशोक सहकारी साखर कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक दाखल झाले आहेत. त्यामुळे भारत राष्ट्र समितीला आता महाराष्ट्रातील पहिला साखऱ कारखाना मिळाला आहे. यानंतर चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील सहकाराच्या राजकारणातही प्रवेश केला आहे. मुरकुटे यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी 7 जुलैला हैदराबाद येथे चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती.

शिर्डी पोलिसांची धडक कारवाई, तीन लाख किमतीचा २१ किलो गांजा जप्त, एकाला अटक, तिघे फरार

कोण आहेत भानुसाद मुरकुटे?

भानुदास मुरकुटे हे मुळचे शरद पवार यांचे समर्थक आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. 1990 साली ते जनता दलाच्या तिकीटावर तर 1995 साली ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर शरद पवार यांच्यासह त्यांनी काँग्रेसला रामराम करत स्थापनेपासूनच राष्ट्रवादीचे सक्रिय सदस्य होते. मात्र नंतरच्या काळात शिर्डी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेकडून दिवंगत बाळासाहेब विखे यांच्याविरूद्ध निवडणूक लढवली होती. त्यात मुरकुटेंचा पराभव झाला होता. त्यानंतर ते श्रीरामपुरमध्ये लोकसेवा विकास आघाडीच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून राजकारण करत आहेत.

राऊतांची भविष्यवाणी ते अजितदादांच्या पोस्टरची भीती; काय आहे शिंदेंच्या मोदी भेटी मागचे कारण

तेलंगणातील सत्ताधारी पक्ष मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात ताकद वाढवत आहे. मागील काही दिवसांपासून त्यांनी महाराष्ट्रात राजकीय सक्रियता वाढवली आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर इथे सभा घेऊन भारत राष्ट्र समितीसाठी जमीन तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय मोठ्या संख्येनं आमदार, एका माजी खासदार महोदयांनाही त्यांनी पक्षाच्या गोटात दाखल करुन घेतलं आहे. नांदेडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवत त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणातही प्रवेश केला आहे. अशात आता त्यांनी सहकाराच्या राजकारणातही प्रवेश केला आहे.

भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची नावं :

  1. भानुदास काशिनाथ मुरकुटे
  2. पुंजाहरी तुकाराम शिंदे
  3. अॅड सुभाष साखरी चौधरी
  4. हिम्मतराव माधवराव धुमाळ
  5. कोंडीराम बाबाजी उंडे
  6. सुरेश मच्छिंद्र गलांडे
  7. दिगंबर सर्जेराव शिंदे
  8. बाबासाहेब पाराजी काळे
  9. ज्ञानदेव मोहन साळुंके
  10. भाऊसाहेब धोंडीराम उंडे
  11. बाबासाहेब कडूजी आदिक
  12. आदिनाथ निवृत्ती झुरळे
  13. दत्तात्रय नाईक
  14. दशरथ विठोबा पिसे
  15. रमेश नानासाहेब वारुळे
  16. रामभाऊ तुळशीराम कासार
  17. ज्ञानेश्वर बाबासाहेब काळे
  18. विरेश भाऊसाहेब गलांडे
  19. यशवंत गोविंद बनकर
  20. यशवंत दिनकर रणनवरे
  21. आबासाहेब बाबासाहेब गवारे
  22. ज्ञानेश्वर भिकाजी शिंदे
  23. योगेश भाऊसाहेब विटनोर
  24. अच्युतराव गुलाबराव बडाख
  25. अमोल बाळासाहेब कोकणे
  26. निवृत्ती भागवत थोरात
  27. अ‍ॅड. उमेश लटमाले
  28. रंजीत बनकर
  29. जितेंद्र अशोक तोरणे
  30. किशोर शामराव बनसोडे
  31. हरिदास दादा वेताळ
  32. शिवाजी मुठे
  33. गणेश विश्वनाथ भाकरे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube