राऊतांची भविष्यवाणी ते अजितदादांच्या पोस्टरची भीती; काय आहे शिंदेंच्या मोदी भेटी मागचे कारण
Maharashtra Politics: महाराष्ट्राचा राजकारणात गेल्या वर्षभरात अनेक उलथापालथी झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केले. अचानकपणे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव समोर आले. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला असल्याचे सांगितले आहे. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे हे अपात्र झाल्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होणार असे म्हटले आहे. या सगळ्या चर्चांच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सपरिवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
अजितदादांना कोणते काका जवळचे होते? शरद पवार सोडून इतरांशी कसे होते संबंध?
मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली भेट ही सपरिवार असल्याकारणाने याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याचे सांगण्यात आले आहे. ही एक सद्भावना भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीमध्ये महाराष्ट्रात मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्ती बाबत मोदींनी विचारपूस केल्याचे शिंदे यांनी सांगितले. परंतु राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे हे मोदींची भेट घेण्यासाठी गेले आहे.
Today met Hon. Prime Minister @narendramodi ji.
I thank Hon. Modiji for affectionately enquiring and sharing quality time with my family.
Had a discussion with Hon. Modiji regarding the various ongoing development projects in Maharashtra, Hon. Modiji assured full support from… pic.twitter.com/GVcFVBEna3
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 22, 2023
गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की अजित पवार हे भाजपसोबत आल्याने भाजपची एकनाथ शिंदे व शिवसेनेवर असलेली निर्भरता संपुष्टात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा बॅनर लागले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असे ट्विट केले आहे. या कारणामुळे शिंदेंचे टेन्शन वाढले असल्याचे बोलले जात आहे.
Ajit Pawar : माझा राजकारणातला वारसदार कोण? अजितदादांनी उत्तर सांगूनच टाकलं
या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक दिवस अगोदरच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज 22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा वाढदिवस असतो. विधानसभेचे कामकाज शनिवार व रविवार बंद असल्याने शिंदेंनी फडणवीसांना वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या. परंतु अजित पवार यांना त्यांनी आज ट्विट करत शुभेच्छा दिल्या.
विधिमंडळातील भाजप कार्यालय येथे उपस्थित राहून उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांना वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या २२ जुलै रोजी वाढदिवस असतो. मात्र पुढील दोन दिवस अधिवेशनाला सुट्टी असल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांना वाढदिवसाच्या… pic.twitter.com/de6FConrE0
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 21, 2023
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. राऊत म्हणाले की, फडणवीस व अजित पवार हे एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत. या सर्व गोष्टी स्क्रिप्टनुसार होणार आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी अशा चर्चांना काहीही आधार नसल्याचे म्हटले आहे. असे जरी असले तरी गेल्या काही वर्षातील महाराष्ट्राचे राजकारण पाहता कधी काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही.