Stock Market : चीन पुढच्या आठवड्यात मोठी घोषणा करणार आहे. ज्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांवर दिसू शकतो. अशा परिस्थितीत चीन पुन्हा एकदा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करणार आहे, जी मागील महिन्यात केली होती. साहजिकच, यावेळीही चीनचा डाव भारतीय गुंतवणूकदारांना महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ब्लूमबर्गने 23 आघाडीच्या गुंतवणूकदारांच्या सर्वेक्षणानंतर दावा केला आहे की, चीन सरकार पुढील आठवड्यात 283 अब्ज डॉलर (सुमारे 24 लाख कोटी रुपये) चे मदत पॅकेज जारी करणार आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये चीनने 12 लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जारी केले होते. त्यानंतर शांघाय स्टॉक एक्सचेंजचे मार्केट कॅप सुमारे 269 लाख कोटी रुपयांनी वाढले होते. याउलट, भारतीय शेअर बाजारात सलग 5 सत्रांमध्ये घसरण दिसून आली आणि गुंतवणूकदारांचं16 लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं. यावेळी दुप्पट मदत पॅकेज जारी केल्यास त्याचाही दुप्पट परिणाम होऊ शकतो, असा अंदाज गुंतवणूकदार आणि विश्लेषक व्यक्त करत आहेत.
Stock Market: शेअर बाजाराची संथ सुरुवात; सेन्सेक्स अन् निफ्टीही मोठा घसरला, कोणते शेअर्स वधारले?
गेल्या आठवड्यातील आकडेवारी पाहिली तर त्याचं उत्तर तुम्हालाच मिळेल. खरं तर, चीनच्या मदत पॅकेजच्या घोषनेनंतर अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार दोन्हीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. बाजारातील मागणीही वाढली, कारण व्याज कमी करून 5 कोटी लोकांना थेट फायदा झाला. भारताच्या तुलनेत चीनच्या बाजारपेठेची व्याप्ती वाढल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी येथून पैसे काढून तिथे टाकण्यास सुरुवात केली. फॉरेन इन्व्हेस्टर पोर्टफोलिओ (FPI) ची गुंतवणूक कमी होताच बाजारात घसरण सुरू होते. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून एफपीआयने भारतीय बाजारातून सुमारे 20 हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत. ज्याचा परिणाम घसरणीच्या रूपात दिसून आला. एफपीआयने पुन्हा माघार घेण्यास सुरुवात केल्यास पुढील आठवड्यातही बाजाराला घसरण होण्याची भीती आहे.
पॅकेज का जाहिर करत आहे?
कोरोनाने संपूर्ण जगाला हैराण केले होते. चीनला याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागला. यामुळे केवळ अर्थव्यवस्थाच मंदावली नाही, तर सरकार आणि जनतेच्या खर्चातही लक्षणीय घट झाली. त्याचा परिणाम चीनच्या व्यवसायावरही दिसून आला. जगातील सर्वात मोठ्या कारखान्यातील औद्योगिक वाढही मंदावली. साहजिकच यातून बाहेर पडण्यासाठी चीनने मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली असून, त्याचा परिणामही दिसून येत आहे.