Washington : अमेरिकेतून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेत अंदाधुंद गोळीबाराच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. आताही अशीच थरकाप उडविणारी घटना घडली आहे. अमेरिकेतील लेविस्टन शहरात एका व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेन देशभरात खळबळ उडाली आहे. या गोळीबारात दहा ते बारा जण गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य 60 जण जखमी झाले आहेत. यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्ती केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका शूटरने बुधवारी रात्री हा हल्ला घडवून आणला.
या घटनेची माहिती देत एंड्रोस्कोगिन काउंटी शेरीफ कार्यालयाने आपल्या फेसबुक पेजवर संशयितांचे दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये एक बंदूकधारी व्यक्ती खांद्यावर बंदूक घेऊन उभा आहे. एका कार्यालयात प्रवेश करताना हा व्यक्ती दिसत आहे. सध्या हा व्यक्ती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या काळ्या रंगाच्या वाहनाचाही शोध घेतला जात आहे.
मेन स्टेट पोलिसांनी सीएनआयला दिलेल्या माहितीनुसार, पोलीस संशयिताच्या कारचा शोध घेत आहेत. रुग्णांना दवाखान्यात दाखल करून घेण्यासाठी प्रादेशिक रुग्णालयांशी संपर्क साधला जात आहे. या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. यातील काही नागरिकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. लेविस्टन हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे. लेविस्टन एंड्रोस्कोगिन काउंटीचा भाग असून मेनेतील सर्वात मोठे शहर असलेल्या पोर्टलँडच्या उत्तरेला जवळपास 56 किलोमीटर अंतरावर आहे. या घटनेने सगळेच हादरून गेले आहेत.
पोलिसांनी हल्लेखोराचा फोटो जारी करत लोकांकडे मदत मागितली आहे. फोटोत लांब बाह्या असलेला शर्ट आणि जीन्स पँट परिधान केलेला आणि चेहऱ्यावर दाढी असलेला व्यक्ती फायरिंग रायफनलने गोळीबार करताना दिसत आहे. याबाबत लेविस्टनमधील सेंट्रल मेन मेडिकल सेंटरने एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. या घटनेत मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे.
Vladimir Putin : पुतिन एकदम फिट अँड फाईन; हार्टअटॅकच्या केवळ अफवा, क्रेमिनिलचा दावा