China Pakistan Relation : पाकिस्तानला त्याचाच मित्र चीनने (China Pakistan Relation) जोरदार झटका दिला आहे. चीनने हायपरसोनिक मिसाइल देण्यास नकार तर दिलाच शिवाय या मिसाइलची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्यासही नकार दिला. हायपरसोनिक मिसाइल (Chinese Hyapersonic Missile) निर्यातीसाठी नाही तसेच या मिसाइलचे कोणतेही एक्सपोर्ट व्हर्जन विकसित केलेले नाही असे चीनने पाकिस्तानला सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
चीनने हायपरसोनिक मिसाइल द्यावी असे पाकिस्तानला (Pakistan News) बऱ्याच वर्षांपासून वाटत आहे. भारताला स्पर्धा देण्यासाठीच पाकिस्तान या मिसाइल्सची मागणी चीनकडे करत होता. भारताने अलीकडच्या काही वर्षांत हायपरसोनिक मिसाइल सिस्टम, बॅलेस्टिक मिसाइल, सुपरसोनिक क्रूज मिसाइल आणि हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेइकल यांसारखे अत्याधुनिक हत्यारे विकसित केली आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय ब्रह्मोस मिसाइलची ताकद पाहून पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. आता पाकिस्तानला अशी मिसाइल पाहिजे आहे जी आवाजाच्या गतीपेक्षा पाच पट जास्त वेगवान असेल.
China : खोटं बोललात तर अकाउंट बंद! चीनच्या जिनपिंग सरकारचा कठोर नियम; काय होणार?
चीनने स्पष्ट केले आहे की स्पेशल हायपरसोनिक मिसाइलचे टेक्निक गुप्त राखले जाणार आहे. दर ही टेक्निक पाकिस्तानला दिली तर पाश्चिमात्य देश किंवा त्यांच्या गुप्तचर यंत्रणांना यावर रिसर्च करण्याची संधी मिळू शकते अशी भीती चीनला वाटत आहे. जर असं घडलं तर याद्वारे सैन्य रणनितीशी संबंधित रहस्य उघड होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांवर विश्वास ठेवला तर चीन DF 17 सारख्या मिसाइल अमेरिका आणि त्याच्या मित्रांविरोधात एक घातक हत्या म्हणून मानतो. त्यामुळे या मिसाइलची टेक्निक कोणत्याही देशाला देण्याची चीनची तयारी नाही.
सध्याच्या काळात चीन आणि पाकिस्तान यांच्यात संरक्षण क्षेत्रात सहकार्य सातत्याने वाढत आहेत. भारताविरुद्ध पाकिस्तानचा वापर करण्याचं काम चीन करत आहे. परंतु, असे असले तरी काही गोष्टी चीन पाकिस्तानला देत नाही. दोन्ही देश सीपेक, फायटर जेट, नौसैनिक जहाजे आणि अन्य मिसाइल सिस्टमवर एकत्रित काम करत आहेत. पण हायपरसोनिक मिसाइलच्या बाबतीत चीनची भूमिका कठोर आहे. या मिसाइलची टेक्निक पाकिस्तानला देण्यास चीनने नकार दिला आहे. त्यामुळे दोन्ही देशातील मैत्री किती तकलादू आहे हे जगासमोर आले आहे.
Israel Iran War दरम्यान चीन अन् रशियाची भूमिका ठरणार तिसऱ्या महायुद्धाची नांदी?