ट्रम्प सरकार हैराण! अमेरिकेत हिंसक प्रदर्शने, वाहनांना आगी लावल्या; आंदोलक पोलिसांत झटापट

Donald Trump : अमेरिकेत सध्या सरकारच्या इमिग्रेशन धोरणाच्या विरोधात तेथील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक शहरांत एकाच वेळी हिंसक आंदोलने सुरू झाली आहेत. त्यामुळे ट्रम्प सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. पोलीस आणि आंदोलकांत हिंसक झटापटी होत आहेत. आंदोलन इतकं हिंसक झालं आहे की आंदोलक आता वाहनांना पेटवून दे आहेत. याच कारणामुळे कॅलिफोर्निया पोलीस आणि आंदोलकांत झटापट […]

Usa Police

Usa Police

Donald Trump : अमेरिकेत सध्या सरकारच्या इमिग्रेशन धोरणाच्या विरोधात तेथील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक शहरांत एकाच वेळी हिंसक आंदोलने सुरू झाली आहेत. त्यामुळे ट्रम्प सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. पोलीस आणि आंदोलकांत हिंसक झटापटी होत आहेत. आंदोलन इतकं हिंसक झालं आहे की आंदोलक आता वाहनांना पेटवून दे आहेत. याच कारणामुळे कॅलिफोर्निया पोलीस आणि आंदोलकांत झटापट झाली. आंदोलनामुळे चिघळलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दंगेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीनंतर आंदोलकांनी रस्त्यावर आगी लावण्याचे प्रकार सुरू केले. या प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने कॅलिफोर्नियात दोन हजार नॅशनल गार्ड तैनात केले आहेत. लॉस एंजल्समध्येही गार्ड तैनात केले आहेत. या सुरक्षा यंत्रणांकडून जाळपोळीचे प्रकार करणाऱ्या आंदोलकांवर कठोर कारवाई केली जात आहे.

Video : 400 ड्रोन्स अन् 40 मिसाइल; रशियाचा युक्रेवरील हल्ल्याचा व्हिडिओ एकदा पाहाच..

ट्रम्प यांनी गव्हर्नरांना झापलं

अमेरिकेत सध्या ट्रम्प सरकारच्या इमिग्रेशन धोरणाचा जोरदार विरोध होत आहे. या धोरणाला विरोध करण्यासाठी विविध शहरांत लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क या शहरांत इतका हिंसाचार झाला की परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांची पुरती दमछाक होत आहे. आंदोलकांनी येथे तोडफोड केली. वाहनांना आगी लावल्या.

या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांत धुमश्चक्री उडाली. यानंतर संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी राज्यांच्या गव्हर्नरना चांगलंच झापलं. येथील चिघळलेली परिस्थिती पाहता डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅलिफोर्निया आणि लॉस एंजेलिस शहरांत नॅशनल गार्ड्स नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकांचा सरकारच्या धोरणाला विरोध का

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये मागील काही दिवसांपूर्वी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी 44 पेक्षा जास्त लोकांना अटक केली होती. या अटकेचा विरोध करण्यासाठी लोकांनी रस्त्यावर येत निदर्शने केली होती. यानंतर येथे आधी प्रदर्शन नंतर हिंसक प्रदर्शन सुरू झाले. इमिग्रेशन आणि सीमा शुल्क प्रवर्तन (ICE) विभागाने लॉस एंजेलिस शहरात काही ठिकाणी छापे टाकले होते. या छापेमारीत काही लोकांना ताब्यात घेतले. यात मुख्य युनियन नेते डेविड ह्यूएर्टा यांचाही समावेश होता.

भारताची नक्कल..पाकिस्तानला पडली महागात, शिष्टमंडळाची अमेरिकेत झाली मोठी फजिती

Exit mobile version